लेह, पॅंगॉन्ग लेक, नुब्रा व्हॅली, तुर्तुक, कारगिल, सोनमर्ग, गुलमर्ग आणि श्रीनगर

कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे,

पहिला दिवस

सोमवार दि. २७ जून २०२

पुणे ते लेह विमानप्रवास

              आपण अंदाजे सकाळी ६:४५ वाजता लेह विमानतळावर पोहोचणार आहोत, त्यानंतर आपण लेह मधील हॉटेल वर जाणार आहोत, हॉटेलमध्ये पोहोचल्या नंतर आपल्याला वेलकम ड्रिंक देण्यात येणार आहे, त्यानंतर आपण वातावरणाशी जुळूवुन घेण्यासाठी हॉटेल वरच आराम करणार आहोत, दुपारी आपण लेह शहरातील मार्केट, शांती स्तुप आणि लेह पॅलेस पाहणार आहोत, नंतर हॉटेल वर येऊन लेह मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. 

दुसरा दिवस

मंगळवार दि. २८ जून २०२

लेह – खारडोन्ग-ला पास – नुब्रा व्हॅली

             सकाळी लवकर नाष्टा करून आपण नुब्रा व्हॅली कडे निघणार आहोत, वाटे मध्ये आपण खारडोन्ग-ला पास मार्गे जाणार आहोत, खारडोन्ग-ला पास हा जगातील सर्वात उंच पास आहे (समुद्र सपाटी पासून १८,३८० फुट उंच), नंतर आपण आपल्या गाडीने नुब्रा व्हॅली मध्ये उतरणार आहोत, नुब्रा व्हॅली मध्ये आपण दुपारचे जेवण झाल्यानंतर स्वखर्चाने उंट सफारी करणार आहोत, सफारी नंतर आपण नुब्रा येथील कॅम्प मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. 

तिसरा दिवस

बुधवार दि. २९ जून २०२

नुब्रा तुर्तुक नुब्रा

              सकाळी नाष्टा करून आपण तुर्तुक कडे जाणार आहोत, तुर्तुक हे गाव अतिशय रमणीय भूप्रदेशात आणि सुंदर ठिकाणी वसलेले आहे. नुब्रा पासून ११५ किमी च्या अंतरावर तुर्तुक गाव आहे अंदाजे ३ ते ४ तास लागतात दुपारी तेथे पोहोचल्यानंतर आपण भारत आणि पाकिस्तान बोर्डर पाहणार आहोत, परंतु सध्या बोर्डरवर जास्त तणाव असल्याकारणाने आपल्याला लांबूनच बोर्डर पहावी लागणार आहे, एकूण फक्त ४००० लोकसंख्या आहे गावामध्ये, ४० वर्षापासून तेथे इस्लामी लोकांचे वास्तव्य आहे, त्यांची भाषा हि बालीस्तानी आहे,अतिशय सुंदर असे गाव आहे आणि त्या गावामधून आपण फेरफटका मारून त्यांच्याशी संवाद करणार आहोत, संध्याकाळी आपण पुन्हा आपण हुंडर गावामध्ये परत येवून रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत,

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

चौथा दिवस

गुरुवार दि. ३० जून २०२

नुब्रा व्हॅली – शायोक नदी – पॅंगॉन्ग लेक

              सकाळी लवकर नाष्टा करून, आपण पॅंगॉन्ग लेक कडे शायोक नदी मार्गे जाणार आहोत, दुपारी पॅंगॉन्ग लेक येथे पोहोचणार आहोत पॅंगॉन्ग लेक येथील कॅम्प मध्ये चेक इन करून आपण पॅंगॉन्ग लेकच्या सौंदर्याचा आनंद घेणार आहोत, पॅंगॉन्ग लेक वरून दिसणारे चीनची सीमा पाहणार आहोत रात्रीचे जेवण करून आपण पॅंगॉन्ग येथे कॅम्प मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. 

पाचवा दिवस

शुक्रवार दि. १ जुलै २०२

पॅंगॉन्ग लेक – लेह

            सकाळच्या नाष्ट्या नंतर आपण चांगला पास मार्गे लेह कडे निघणार आहोत, वाटे मध्ये आपण करू येथील इंडस आणि हेमिस मॉनेस्ट्री, ह्या मॉनेस्ट्री लडाख मधील फेमस आणि सर्वात मोठ्या मॉनेस्ट्री आहेत त्या पाहून आपण लेह कडे निघणार आहोत, लेह मधील हॉटेल ला पोहोचून रात्रीचे जेवण करून आपण तेथे मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. 

सहावा दिवस

शनिवार दि. २ जुलै २०२

लेह – कारगिल

            सकाळच्या नाष्टा करून आपण कारगिल कडे निघणार आहोत, वाटे मध्ये आपण हॉल ऑफ फेम, गुरुद्वारा,पत्थर  साहिब, मॅग्नेटिक हिल आणि झंस्कार नदी सुद्दा पाहणार आहोत, मार्गावरती असलेली स्पिटुक मॉनेस्ट्री  सुद्दा पाहणार आहोत, लामायुरू मोनॅस्टरी पाहणार आहोत, वरतील सर्व स्थळे पाहिल्या नंतर आपण कारगिलकडे निघणार आहोत,  हॉटेल वरती पोहोचून कारगिल मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण. 

सातवा दिवस

रविवार दि. ३ जुलै २०२

कारगिल द्रास सोनमर्ग

              सकाळी नाष्टा करून सोनमर्गकडे निघणे, दुपारी सोनमर्ग मधील निसर्ग रम्य स्थळांना दर्शन करणार आहोत,घोड्याने आपण सोनमर्ग मधील निसर्गरम्य स्थळांना भेट देणार आहोत,घोड्याने थाजीवास मधील हिम नदी आपण पाहणार आहोत येथे खूप सिनेमाची शूटिंग झाली आहे,नुकताच प्रदर्शित झालेला सलमान खानच्या बजरंगी भाईजानची शेवटची शूटिंग भारत आणि पाकिस्तानची सीमा येथेच दाखवली गेली आहे,तसेच कस्मे वादे मधील कस्मे वादे या गाण्याची शूटिंग येथेच झाली आहे आणि राम ‘तेरी गंगा मैली हो गई या गाण्याची शूटिंग येथील पुलावरूनच झाली आहे, रात्री श्रीनगर हॉटेल मध्ये परत येऊन रात्रीचे जेवन करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

 

आठवा दिवस

सोमवार दि. ४ जुलै २०२२

श्रीनगर गुलमर्ग – श्रीनगर

                 सकाळी नाष्टा करून आपण गुलमर्ग कडे निघणार आहोत गुलमर्ग समुद्र सपाटी पासून २४४०मी उंचीवर आहे, काश्मीर मधले पर्यटनाचे आकर्षण ठिकाण म्हणजे गुलमर्ग. अतिशय सुंदर अशा उंच ठिकाणी गुलमर्ग वसलेले आहे आणि गवताच्या मैदानातील फुले असेही गुलमर्गला म्हणतात, जगातील खूप मोठा गोल्फ कोर्स आणि हिवाळ्यातील प्रसिद्ध असलेल्या बर्फामधील स्केटिंगज येथे खेळल्या जातात, असो आपण तेथे पोहचल्यावर सर्वात आधी जय जय शिव शंकर टेम्पल पाहणार आहोत येथे राजेश खन्नाचा प्रसिद्ध असलेला आप कि कसम या सिनेमातील जय जय शिव शंकरचे गाणे याच मंदिराच्या परिसरातले आहे, तेथे गेल्यावर आपल्याला लगेच त्या सिनेमाची आठवण होतेच, दुपारनंतर गुलमर्ग मधील प्रसिद्ध असलेला गोंडाला ( रोप वे ) आपण पाहणार आहोत, इतर प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन संध्याकाळी आपण परतीचा प्रवास करून श्रीनगर हॉटेल मध्ये जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

नववा दिवस

 मंगळवार दि. ५ जुलै २०२२

              सकाळी लवकर नाष्टा करून आपण श्रीनगर मधील धार्मिक आणि निसर्गरम्य असलेल्या शंकराचार्य मंदिर, निशात गार्डन, चश्मेशाही पाहून आपण दुपारी श्रीनगर विमान तळाकडे निघून संध्याकाळच्या ५.०५ च्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने पुण्याकडे निघणे रात्री ११ वाजता पुणे विमानतळावर आगमन करणे.

जेवण = सकाळचा नाष्टा.

Important information

Inclusions

१. ८ रात्र निवास २ व्यक्ती प्रत्येक एका रूम शेअरिंग असा असेल. २. कार्यक्रम पत्रीके नुसार सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण असेल. ३. लेह लोकल आणि श्रीनगर पर्यंत नॉन एसी गाडी असेल. ४. वाइल्ड लाईफ फि आणि रेड क्रॉस फि समाविष्ट आहे. ५. पर्यावरणविषयक कर समाविष्ट आहे. ६. इंनर लाईन परमिट समाविष्ट आहे. ७. टोल टॅक्स, पार्किंग, ड्राइवरचा भत्ता समाविष्ट आहे

Exclusions

१. विमान प्रवास / रेल्वे प्रवास. २. ऑक्सिजनची बाटली खर्च. ३. कोणत्याहि प्रकारचे वैयक्तिक खर्च किंवा अतिरिक्त भोजन. ४. गाईड फि, कॅमेरा फि किंवा मॉनेस्ट्री प्रवेश फि. ५. वैद्यकीय प्रवासी विमा. ६. प्रवासा मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केल्यास उदभवणारे खर्च. ७. विमान रद्द झाल्या मुले किंवा रोड ब्लॉक झाल्या मुळे होणार अतिरिक्त खर्च इत्यादी.

Departure details

NA

Book a tour

Inclusion

Charges

 

 Package 1

२४,७०० /- ६ रात्र आणि ७ दिवस लेह, तुर्तुक आणि लडाखसह

 

Package 2

२७,५०० /-  ८ रात्र आणि ९ दिवस लेह, लडाख आणि श्रीनगरसह 

५ % gst वेगळा

Tour Dates

27 June 2022