कन्याकुमारी, मुन्नार, पेरियार अभयारण्य, थिरूवनंतपुरम, अल्लेप्पी आणि कोचीन सहल

पहिला दिवस

गुरुवार दि.२७ ऑक्टोबर २०२२

पुणे – पनवेल – त्रिवेंद्रम – कन्याकुमारी

            पुणे रेल्वे स्टेशनवरून ६ च्या नांदेड पनवेल एक्सप्रेसने पनवेलकडे निघणे. सकाळी १० वा. पनवेल पोच दुपारी १२.३० च्या नेत्रावती एक्सप्रेसने निघणे, संपूर्ण दिवसभर अविस्मरणीय कोंकण रेल्वेचा अनुभव घेत आपण कोचीनकडे निघणे.

दुसरा दिवस

शुक्रवार दि. २८ ऑक्टोबर २०२२

त्रिवेंद्रम – कन्याकुमारी

            संध्याकाळी ६.३० वाजता त्रिवेन्द्रम रेल्वे स्टेशनवर उतरून बसने कन्याकुमारीकडे निघणे, रात्री ठीक १० वाजता कन्याकुमारी येथील हॉटेलमध्ये पोहोचून मुक्काम करणार आहोत.  

जेवन = रात्रीचे जेवण.  

 तिसरा दिवस

शनिवार दि. २९ ऑक्टोबर २०२२

कन्याकुमारी

            सकाळी नाष्टा करून संपूर्ण दिवसभर कन्याकुमारी मधील धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळांना भेट देऊन रात्री जेवण करून कन्याकुमारी मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

चौथा दिवस

रविवार दि. ३० ऑक्टोबर २०२२

कन्याकुमारी – थिरूवनंतपुरम ( कोवालम )

            सकाळी नाष्टा करून थिरुअनंतपूरमकडे निघणे दुपारी थिरुअनंतपूरममध्ये पोहचून पदमनाभम स्वामींचे दर्शन करणार आहोत नंतर संध्याकाळी प्रसिद्ध असलेल्या कोवलम बीचला भेट देऊन रात्री थिरुअनंतपूरम हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.    

  पाचवा दिवस

सोमवार दि. ३१ ऑक्टोबर २०२२

थिरुअनंतपूरम – मुन्नार

            सकाळी नाष्टा करून आपण मुन्नारकडे निघणार आहोत संध्याकाळी मुन्नारमध्ये पोहचुन केरळ मधील प्रसिद्ध असलेली कथकली नृत्य पाहून रात्रीचे जेवण करून हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.  

सहावा दिवस

मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२

मुन्नार

            सकाळी ९ वा. हॉटेलवरून निघून आपण एराविकुलम राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला भेट देणे, एराविकुलम मध्ये जाण्यासाठी तेथील संग्रहालयाच्या गाडीनेच जावे लागते,दुपारनंतर आपण परत येवून संध्याकाळी चहाच्या कारखान्याला भेट देवून संध्याकाळी मुन्नार येथे शॉपिंग  करून रात्री हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

सातवा दिवस

बुधवार दि. २ नोव्हेंबर २०२२

मुन्नार ते थेक्काडी

            सकाळी ९ वा. हॉटेलवरून निघून दुपारी २ वा. थेक्काडी येथे पोहचून हत्ती सफारी, हत्ती बाथिंग करून बाजार पेठेमधून मसाल्यांचे पदार्थ खरेदी करून रात्री थेक्काडी येथील हॉटेल पेरियार हाऊसमध्ये मुक्काम करणे.

जेवन = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

आठवा दिवस

गुरुवार दि. ३ नोव्हेंबर २०२२

थेक्काडी ते अल्लेप्पी

              सकाळी नाष्टा करून ठीक ९ वा.अल्लेपीकडे निघणे दुपारी १ वा.हाउसबोट चेक इन करून दुपारचे जेवण हे हाउसबोटवर  करणार आहोत,दुपारी आपण  हाउसबोटने समुद्र भ्रमंतीला निघणार आहोत संध्याकाळी एका बंदरावर हाउसबोट उभी करून रात्रीचे जेवण हाउसबोटमध्ये करून रात्री हाउसबोटमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.  

नववा दिवस

शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२

अल्लेप्पी ते कोचीन

             सकाळी नाष्टा करून ठीक ९ वा. हाउसबोट चेक आऊट करून कोचीन कडे निघणे दुपारी १२ वा.कोचीन शहरात आगमन करून तेथे आपण डच पॅलेस, सेंट फ्रान्सिस चर्च, कोची फोर्ट, मासे पकडण्याचे चीनी जाळे असे अनेक इतर ऐतिहासिक स्थळ दर्शनांना भेट देवून रात्री ९ वा.कोचीन एयरपोर्ट कडे निघणे कोची ते पुणे विमानाने पुण्याकडे निघणे.

             रेल्वे प्रवासी दुपारी ३ च्या कन्याकुमारी पुणे एक्सप्रेसने पुण्याकडे निघणार आहेत.

जेवन = नाष्टा.

दहावा दिवस

शनिवार दि. ५ नोव्हेंबर २०२२

            मध्य रात्रीच्या विमानाने पुण्याकडे निघणे.

Important information

Inclusions

१. पुणे ते पनवेल हा प्रवास रेल्वेच्या स्लीपर क्लासने करण्यात येईल. २. पनवेल ते त्रिवेंद्रम हा प्रवास रेल्वेच्या स्लीपर क्लासने करण्यात येईल. ३. कोचीन ते पुणे हा प्रवास रेल्वेच्या स्लीपर क्लासने करण्यात येईल. ४. हॉटेलचे वास्तव्य हे उत्तम प्रतीचे दोघांमध्ये किंवा तिघांमध्ये एक रूम असेल. ५. स्थळ दर्शन करण्यासाठी वातानुकुलीत बस असेल. ६. जेवणाचा कार्यक्रम हा ठरवून दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार असेल.

Exclusions

१. विमानाच्या ठरलेल्या दरापेक्षा वाढलेले विमान दर, विमानतळावरील कर, सरकारी कर, इंधन कर आणि एन वेळेस सरकारने लावलेले कर हे समाविष्ट नसेल. २. प्रवासाच्या वेळी अचानक काही कारणास्तव जर विमान रद्द,विमान कंपनीमध्ये बदल,मार्ग बदल किंवा हॉटेल वास्तव्य याचा खर्च समाविष्ट नाही. ३. दुपारच्या जेवणाचा खर्च. ४. सहली दरम्यान अचानक उद्भवणारे आजार, अपघात, हॉस्पिटल चा खर्च समाविष्ट नाही. ५. बागेची प्रवेश फी तसेच मंदिरामधील प्रवेश फी. ६. एराविकुलम राष्ट्रीय पार्क मधील बस फी. ७. थेक्काडी येथील जंगल जीप सफारी. ८. कथाकली नृत्य फी. ९. हत्ती सफारी फी.

Departure details

Traveler pickup is offered. Pick up and Drop off is limited within General Luna only Hotel pickup is offered. View the hotel list on our checkout page to see if yours is included among the pickup points.

Book a tour

Inclusion

Charges

₹ 22700/- +GST

Tour Dates

27 OCTOBER 2022