९ रात्र आणि १० दिवस

संपूर्ण राजस्थान सहल मारवाड आणि मेवाड सह

जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, जयपूर, पुष्कर, अजमेर, चित्तोडगड, उदयपूर, अंबाजी आणि अहमदाबाद

पहिला दिवस

 सोमवार दि.१३ नोव्हेंबर २०२३

पुणे – अहमदाबाद

           पुणे रेल्वे स्टेशन वरून रात्री ९.३५ च्या दुरोन्तो एक्स्प्रेसने अहमदाबादकडे निघणे रात्रभर ट्रेन प्रवास.

जेवण =  नाही.                                                                           

दुसरा दिवस

मंगळवार दि. १४ नोव्हेंबर २०२३

अहमदाबाद – जोधपूर

           सकाळी ७ वाजता आपण अहमदाबाद स्टेशनवर उतरून बसने जोधपूरकडे निघणार आहोत संध्याकाळी जोधपुर मध्ये पोहोचून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

तिसरा दिवस

बुधवार दि. १५ नोव्हेंबर २०२३

जोधपूर – जैसलमेर

            सकाळी नाष्टा करून फ्रेश होऊन जोधपूर मधील स्थळ दर्शन करणार आहोत, त्यामध्ये आपण जोधपूरचा प्रसिद्ध असा मेहरानगड फोर्ट, जसवंत टाडा आणि उमेद भवन पाहणार आहोत, दुपारनंतर आपण जैसलमेरकडे निघणार आहोत जोधपूर ते जैसलमेर हे अंतर अंदाजे २८५ किमीचे आहे, संध्याकाळी जैसलमेरमधील हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

चौथा दिवस

गुरुवार दि. १६ नोव्हेंबर २०२३

जैसलमेर

           सकाळी नाष्टा करून चेक आऊट करून आपण जैसलमेरचा सुप्रसिद्ध असलेला जैसलमेरचा किल्ला पाहणार आहोत, कमीतकमी दोन तास तरी लागतील किल्ला पाहण्यासाठी गाईड घ्यावाच लागेल कारण त्याशिवाय तुम्हाला किल्ल्याची माहिती आणि इतिहास कळणारच नाही, तसा किल्ला खूप मोठा आहे ५ ते ६ तास लागतील पण थोडक्यातच गाईडला सांगा कि किल्ला दाखवायला, नंतर आपण पतवॊनकी हवेली, म्युझियम पाहून ठीक दुपारी ३ वा. आपण जैसलमेर मधील टेंट सिटीकडे निघणार आहोत, साम मध्ये पोहोचून साम मधील वाळवंटातील डेझर्ट कॅम्पमध्ये चेक इन करून लगेच वाळवंटात उंट सफारी व वाळवंटातील नयनरम्य सूर्यास्त आपण पाहणार आहोत, हा कार्यक्रम पाहिल्यानंतर परत आपल्या वाळवंटातील कॅम्प मध्ये येऊन तेथील पारंपरिक नृत्याचा आनंद घेणार आहोत. कार्यक्रम संपल्यावर आपण मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेणार आहोत, जेवण झाल्यावर शतपावली करून रात्री आपण डेझर्ट कॅम्पमधील तंबू मध्येच मुक्काम करणार आहोत, ( राजस्थान सहल म्हटले कि एकदा तरी वाळवंटातील तंबू मध्ये मुक्काम करावाच तरच तुमची राजस्थान सहल हि यशस्वी होतेच,असो )

जेवण = सकाळचा नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

पाचवा दिवस

शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर २०२३

साम –  जैसलमेर – बिकानेर

              सकाळी नाष्टा करून आपण बिकानेरकडे निघणार आहोत. जैसलमेर ते बिकानेर हे अंतर अंदाजे ३८० किमीचे आहे, तरी आपल्याला बिकानेर मधील हॉटेल वर पोहोचायला संध्याकाळचे ५ तरी वाजतील, पोहचल्यावर बिकानेर मधील हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.     

जेवण = सकाळचा नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

सहावा दिवस

शनिवार दि. १८ नोव्हेंबर २०२३

बिकानेर – करणी माता – जयपूर

           सकाळी लवकर नाष्टा करून हॉटेल चेक आऊट करून बिकानेर मधील प्रेक्षणीय स्थळ दर्शन करून आपण जयपूर कडे निघणार आहोत, बिकानेर ते जयपूर हे अंतर अंदाजे ३९० किमी चे आहे, वाटेमध्ये देशनोक या गावामध्ये प्रसिद्ध असलेले करणी माता मंदिर आपण पाहणार आहोत यालाच रॅट(उंदीर) टेम्पल असेही म्हणतात कारण या मंदिरामध्ये हजारोंनी जिवंत उंदीर आपल्याला पाहावयाला मिळतात तेथील मंदिराची सविस्तर माहिती मंदिरातील गुरुजी अथवा स्थानिक लोक सुद्धा सांगू शकतात, रात्री जयपूर मधील हॉटेल मध्ये जेवण करून मुक्काम करणार आहोत. 

जेवण = सकाळचा नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

सातवा दिवस

रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३

जयपूर

              सकाळचा नाष्टा करून आपण बसने  संपूर्ण दिवसभर जयपूर स्थळ दर्शन करणार आहोत, जयपूर शहर तुम्हाला बघायचे असेल तर कृपया गाईड घ्यावाच, संपूर्ण दिवसभर तुम्हाला जयपूर शहर हा गाईडच दाखवेल, जयपूर शहर हे गुलाबी रंगाचे शहर म्हणून ओळखले जाते,कारण संपूर्ण शहराच्या बहुतेक इमारती ह्या गुलाबी रंगाच्या आहेत, खरेदी करायची असेल तर जोहरी बाजार मध्ये करावी, नंतर हवा महल, सिटी पॅलेस, जंतर मंतर, गोविंद टेम्पल, अल्बर्ट हॉल म्युझियम मधील प्रसिद्ध असलेला शिश महल, बिर्ला मंदिर पाहून संध्याकाळी आपण चोखी धानि येथील राजस्थानी डान्स आणि जेवणाचा आस्वाद स्वखर्चाने घेऊ शकता, एक गोष्ट लक्षात घ्या कि याच दिवशी तुम्हाला जयपूर शहरामधील स्थळ दर्शन पूर्ण करायचेच आहे, दुसऱ्या दिवशी शक्यच नाही होणार. रात्री जयपूर मधील हॉटेल मध्ये मुक्काम करणे.       

जेवण = सकाळचा नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

आठवा दिवस

सोमवार दि. २० नोव्हेंबर २०२३

जयपूर – पुष्कर – अजमेर

              सकाळी लवकर नाष्टा करून हॉटेल चेक आऊट करून अजमेरकडे निघणार आहोत जयपूर ते अजमेर अंतर अंदाजे १५० किमीचे आहे आपण दुपारी पुष्करला अंदाजे तीन तासांचा प्रवास करून पोहोचून आपण पुष्कर मधील ब्रह्मा मंदिर आणि पुष्कर मधील पुष्कर सरोवर पाहणे प्रथम पुष्कर सरोवर पाहणे, शक्य असेल तर अंघोळ केलीली बरी, तेथील विधी आटोपून ब्रह्मा दर्शन करणे, शक्यतो पुष्कर मध्ये गाईड घ्यावाच, गाईड व्यवस्थित माहिती सांगून तुम्हाला गुरुजींची भेट घालून देईलच दुपार नंतर अजमेरकडे निघणे, अजमेरमधील अजमेर शरीफ दर्गा पाहणार आहोत, दर्गा पाहिल्यावर रात्री आपण अजमेर हॉटेल मध्ये पोहचून जेवण करून हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.     

जेवण = सकाळचा नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

नववा दिवस

मंगळवार दि. २१ नोव्हेंबर २०२३

अजमेर  – चित्तोडगड – उदयपूर

              सकाळी नाष्टा करून हॉटेल चेक आऊट करून आपण चित्तोडगड कडे निघणार आहोत अजमेर ते चित्तोडगड हे अंतर अंदाजे २२० किमीचे आहे, आपण दुपारी ठीक १ वाजता चित्तोडगड मध्ये पोहचून चित्तोडगडचा प्रसिद्ध चित्तोडगड किल्ला पाहणार आहोत, किल्ला खूप मोठा आहे, संपूर्ण किल्ला फिरायला आपण रिक्षा करणेच योग्य आहे संपूर्ण किल्ला फिरायचे असेल तर रिक्षाने अंदाजे दोन ते तीन तास लागतात, किल्ल्यामध्ये प्रसिद्ध असलेला मनोरा म्हणजे विजय स्तंभ, मीरा टेम्पल, कालिका माता मंदिर तसेच राणी पद्मिनीची महाल आणि तिची कहाणी हे सर्व पहावयाचे आणि ऐकायचे  असेल तर आपल्याला गाईड घेणे आवश्यक आहे तरच किल्ल्याची पूर्ण माहिती मिळेल असो नंतर आपण संध्याकाळी ठीक ४ वाजता चित्तोडगड सोडून उदयपूरकडे निघणार आहोत हे अंतर अंदाजे १२० किमीचे आहे रात्री ९ वाजेपर्यंत हॉटेलमध्ये पोहचून रात्रीचे जेवण करून उदयपूर हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

दहावा दिवस

बुधवार दि. २२ नोव्हेंबर २०२३

उदयपूर

             सकाळचा नाष्टा करून आपण बसने  संपूर्ण दिवसभर उदयपूर येथील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, उदयपूरमध्ये सुद्धा गाईड घेणे खूप गरजेचे आहे, त्यामध्ये आपण प्रथम सहेलोंकी बारी, फतेह सागर, सिटी पॅलेस, जग मंदिर, लेक पॅलेस, दुपारनंतर एकनाथ लिंग आणि नाथ द्वारा, नाथद्वारा शहरापासून हे कमीतकमी ४५ किमी अंतरावर आहे शक्यतो शहरामधील संपूर्ण स्थळ दर्शन करूनच मग विचार करावा कि नाथद्वाराला जायचे कि नाही कारण जाऊन येऊन अंदाजे ९० किमीचे अंतर आहे दोन ते अडीच तासांचे अंतर आहे, असो रात्री सर्व स्थळ दर्शन करून आपण आपल्या हॉटेल मध्ये परत येऊन हॉटेल मध्ये येऊन मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

अकरावा दिवस

गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३

उदयपूर – अंबाजी – अहमदाबाद

             सकाळी लवकर नाष्टा करून हॉटेल चेक आऊट करून आपण अंबाजी माता चे दर्शन करून संध्याकाळी अहमदाबाद मधील अक्षरधाम मंदिराचे दर्शन करून रात्री ८ च्या रेल्वेने पुण्याकडे निघणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा .

Important information

Inclusions

  • पुणे ते अहमदाबाद हा प्रवास रेल्वेच्या ३ एसी क्लासने करण्यात येईल.
  • अहमदाबाद ते पुणे हा प्रवास रेल्वेच्या ३ एसी क्लासने करण्यात येईल.
  • हॉटेलचे वास्तव्य हे उत्तम प्रतीचे आणि वातानुकुलीत रूम असेल, रूमचे वाटप हे ट्रिपल आणि डबल शेरिंग बेसिस रूम असणार आहे याची नोंद घ्यावी.
  • ज्या हॉटेल मध्ये आपण राहणार आहोत त्या हॉटेल मध्ये सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण हे बुफे पध्दतीने असणार आहे.

५.  जैसलमेर मधील उंट सफारी फी, राजस्थानी पारंपरिक नृत्य समाविष्ट असेल.

६.  स्थळ दर्शन करण्यासाठी २ x २ बस असेल.

७.   दररोज एक पाण्याची बाटली दिली जाईल.

८.  सर्व प्रकारचे कर आणि पार्किंग समाविष्ट असेल.

९.   आपली सहल हि पुणे ते पुणे असेल.

Exclusions

  • विमान प्रवास.
  • रिक्षा तसेच इतर गाड्यांचा खर्च.
  • जैसलमेर मधील वाळवंटातील जीप सफारीचा खर्च या मध्ये समाविष्ट नाही.
  • गाईडचा खर्च समाविष्ट नाही.
  •  इस्त्री,पोकेट मनी, टेलीफोन चार्जेस,खरेदी,दारू आणि सोफ्ट ड्रींक समाविष्ट नाही.
  •  सहली दरम्यान अचानक उद्भवणारे आजार, हॉस्पिटल चा खर्च समाविष्ट नाही.

Terms and Conditions

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

  रु. २७,७००/-  प्रत्येकी डबल शेरिंग प्रमाणे

 रु. २९,५००/-  प्रत्येकी ट्रिपल शेरिंग प्रमाणे

Tour Dates

 

Payment / Cancelation Information

  1. ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% रक्कम घेतली जाईल ती रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.
  2. बाकीची ७५% रक्कम हि प्रवासाची जी तारिख असेल त्या तारखेच्या १५ दिवस आधी घेतली जाईल.
  3. जर तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या १५ दिवस आधी बुकिंग रद्द करायचे असेल तर १००% रक्कम आकारली जाईल.