12 रात्र आणि 13 दिवस

संपूर्ण मध्य प्रदेश सहल ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू, उज्जैन, ग्वाल्हेर, झांसी, खजुराहो, बांधवगड, भेडाघाट, पंचमढी, शेगाव आणि औरंगाबाद सहल

पहिला दिवस

मंगळवार दि. ७ फेब्रुवारी २०२३

पुणे – ओंकारेश्वर

            संध्याकाळी ठीक ५ वाजता पुणे येथून बसने ओंकारेश्वर कडे निघणे रात्रभर प्रवास करणे.

जेवन = नाही.

दुसरा दिवस

बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०२३

ओंकारेश्वर

             सकाळी ७ वाजता ओंकारेश्वर हॉटेल मध्ये पोहोचून फ्रेश होऊन नाष्टा करून आपण बोटीने ओंकारेश्वरकडे निघणार आहोत साधारण १० मिनिटांचा प्रवास करून आपण ओंकारेश्वर मंदिरामध्ये पोहोचून दर्शन करून परत आपण आपल्या हॉटेलमध्ये येवून रात्री आपण ओंकारेश्वर हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

तिसरा दिवस

गुरुवार दि. ९ फेब्रुवारी २०२३

ओंकारेश्वर – महेश्वर – मांडू –  उज्जैन

             सकाळी लवकर आपण महेश्वरकडे निघणार आहोत, महेश्वरमधील धार्मिक स्थळांना भेट देणार आहोत, महेश्वर या ठिकाणी अनेक प्रकारच्या हिंदी सिनेमांच्या शुटींग झालेल्या आहेत, आपण होळकर घराण्यातील अहिल्याबाई होळकर यांचा किल्ला पाहणार आहोत, त्यानंतर आपण दुपारचे जेवण करून मांडूकडे निघणार आहोत मांडू येथे राणी रूपमती महल, जहाज महाल दुपारी ठीक ३ वाजता उज्जैनकडे निघणार आहोत, साधारण ५ तासांचा प्रवास करून रात्री ८ वाजता उज्जैन मधील हॉटेलमध्ये पोहोचून जेवण करून मुक्क्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

चौथा दिवस

शुक्रवार दि. १० फेब्रुवारी २०२३

उज्जैन

            सकाळी नाष्टा करून आपण श्री महाकालेश्वरचे दर्शन करणार आहोत, त्यानंतर दुपारचे जेवण करून आपण श्री कालभैरव दर्शन करणार आहोत, संध्याकाळी आपल्या हॉटेल मध्ये परत येऊन जेवण करून आपण उज्जैन मधील हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

पाचवा दिवस

शनिवार दि. ११ फेब्रुवारी २०२३

उज्जैन – ग्वाल्हेर

            सकाळी लवकर नाष्टा करून आपण ठीक ७ वाजता ग्वाल्हेरकडे निघणार आहोत, संध्याकाळी ७ वाजता ग्वाल्हेर हॉटेल मध्ये पोहोचून जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

सहावा दिवस

रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३

ग्वाल्हेर – झांसी – खजुराहो

            सकाळी नाष्टा करून आपण ग्वाल्हेर मधील प्रसिध्द किल्ला पाहून आपण झांसीकडे निघणार आहोत, दुपारचे जेवण करून आपण राणी लक्ष्मीबाई यांचा प्रसिद्ध झान्सीचा किल्ला पाहून आपण खजुराहोकडे निघणार आहोत. संध्याकाळी ७ वाजता खजुराहो हॉटेल मध्ये पोहोचून जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

सातवा दिवस

सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३

खजुराहो

             सकाळी नाष्टा करून आपण सुप्रसिद्द कांदारीया महादेव मंदिर, चित्रगुप्त टेम्पल, ११ व्या शतकातील सूर्य मंदिर आणि जैन टेम्पल पाहून संध्याकाळी आपण आपल्या हॉटेलमध्ये परत येऊन जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

आठवा दिवस

मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०२३

खजुराहो – बांधवगड

              सकाळी नाष्टा करून आपण बांधवगड कडे निघणार आहोत, वाटेमध्ये पन्ना येथील चौमुखनाथ शिवा टेम्पल पाहून संध्याकाळी बांधवगड येथे पोहोचून मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

नववा दिवस

बुधवार दि. १५ फेब्रुवारी २०२३

बांधवगड – जबलपूर

              पहाटे ५ वाजता आपण बांधवगड मधील जंगल जीप सफारीकडे निघणार आहोत, जंगल जीप सफारी करून सकाळी ठीक ९ वाजता आपल्या हॉटेलमध्ये परत येवून सकाळचा नाष्टा करून आपण जबलपूरकडे निघणार आहोत, संध्याकाळी ६ वाजता जबलपूर हॉटेलमध्ये पोहोचून रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत,

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

दहावा दिवस

गुरुवार दि. १६ फेब्रुवारी २०२३

जबलपूर – भेडाघाट – पंचमढी

               सकाळी नाष्टा करून आपण भेडाघाटकडे निघणार आहोत, भेडाघाटमध्ये पोहोचल्यावर नर्मदा नदीमधील जगातील सुंदर संगमरवरी मार्बल रॉक आपण पाहणार आहोत, नंतर आपण रोपवे ने सुंदर अशा भेडाघाटचा धुंवाधार धबधबा आपण पाहणार आहोत, दुपारचे जेवण करून आपण पंचमढीकडे निघणार आहोत, संध्याकाळी पंचमढी पोहोचून हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

अकरावा दिवस

शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी २०२३

पंचमढी – शेगाव

             सकाळी नाष्टा करून आपण पंचमढीमधील निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळांना भेट देणार आहोत, त्यामध्ये जटाशंकर शिव मंदिर, गुप्त महादेव मंदिर, पांडव गुफा आणि इतर धार्मिक स्थळांचे दर्शन करून आपण रात्री शेगावकडे निघणार आहोत,

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

बारावा दिवस

शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३

शेगाव – औरंगाबाद

             सकाळी शेगाव मध्ये पोहोचून गजानन महाराज मंदिरामधील भक्त निवास मध्ये फ्रेश होऊन गजानन महाराजांचे दर्शन करून औरंगाबाद कडे निघणार आहोत.संध्याकाळी औरंगाबाद मध्ये पोहोचून मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

तेरावा दिवस

रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३

औरंगाबाद – घृष्णेश्वर – पुणे

            सकाळी नाष्टा करून आपण घृष्णेश्वर येथील महादेवाचे दर्शन करून पुण्याकडे निघणार आहोत संध्याकाळी ६ वाजता पुणे पोच.

जेवन = सकाळचा नाष्टा आणि दुपारचे जेवण.

Important information

Inclusions

 • पुणे ते पुणे हा प्रवास २ x २ नॉन एसी बसने करण्यात येणार आहे.
 • हॉटेल व्यवस्था हि थ्री स्टार दर्जाची असेल.
 • दोघांमध्ये एक रूम असेल.
 • सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे आपल्या आचारी मार्फत बनवलेले शाकाहारी आणि मांसाहारी असेल.
 • बांधवगड मधील जंगल जीप सफारीचा खर्च समाविष्ट असेल.
 • किल्ला, बागेची आणि भेडाघाटमधील रोपवे चा खर्च समाविष्ट आहे.

Exclusions

 • महाकालेश्वर भस्म आरती खर्च.
 • बोटिंग चा खर्च.
 • टिप.

Terms and Conditions

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

 

Tour Dates

 

Payment / Cancelation Information

 1. ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% रक्कम घेतली जाईल ती रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.
 2. बाकीची ७५% रक्कम हि प्रवासाची जी तारिख असेल त्या तारखेच्या १५ दिवस आधी घेतली जाईल.
 3. जर तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या १५ दिवस आधी बुकिंग रद्द करायचे असेल तर १००% रक्कम आकारली जाईल.