पहिला दिवस
मंगळवार दि. २ ऑगस्ट २०२२
पुणे रेल्वे स्टेशनवरून रात्री १० च्या रेल्वेने मंत्रालयमकडे निघणे.
जेवण = नाही.
दुसरा दिवस
बुधवार दि. ३ ऑगस्ट २०२२
सकाळी ६.३० वा. मंथरालयम रेल्वे स्टेशन वर उतरून हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन राघवेंद्र स्वामींचे दर्शन करून मंथनगोडकडे निघणे अंदाजे १ तासाचा प्रवास करून मंथनगोडमधील श्रीपाद वल्लभांचे दर्शन करून रात्री ८ वाजता आपण आश्रम मध्ये पोहचून रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
तिसरा दिवस
गुरुवार दि. ४ ऑगस्ट २०२२
पहाटे ठीक ५ वा.उठून अंघोळ करून आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्म भूमी असलेल्या मंदिराला भेट देणार आहोत,पहाटे ५.३० वा.गाडीने कृष्णा नदी तीरावर जाऊन गोल बोटीने आपण मंदिराकडे जाणार आहोत मंदिरामध्ये पोहचल्यावर तेथे सामुदायिक अभिषेकाचा कार्यक्रम करण्यात येईल,मंदिरामध्ये स्त्रियांना फक्त साडी आणि पुरुषांना सोहळे
आणि पंचा घालूनच मंदिर प्रवेश दिला जातो याची नोंद घ्यावी, असो सामुदायिक अभिषेक झाल्यावर आपण पुन्हा बोटीने परत स्वामींच्या आश्रमात येऊन दुपारचे जेवण करून लगेच वाडीकडे निघणे, संध्याकाळी ४ वाजता वाडीमध्ये पोहोचून संध्याकाळच्या ५ च्या रेल्वेने पिठापुरकडे निघणे.
जेवण = सकाळचा नाष्टा आणि दुपारचे जेवण.
चौथा दिवस
शुक्रवार दि. ५ ऑगस्ट २०२२
सकाळी ८ वाजता पिठापुर रेल्वे स्थानकावर उतरून रिक्षाने आपण श्रीपाद श्रीवल्लभांची जन्म भूमी असलेले मंदिराकडे कडे निघणार आहोत,अंदाजे १० मिनिटाचा प्रवास करून मंदिरामध्ये पोहचून संस्थानाच्या रूम किंवा हॉल मध्ये उतरून अंघोळ करून आपण दुपारचे जेवण करून अण्णावरमकडे निघणार आहोत, अण्णावरममध्ये श्री सत्यनारायणाचे मंदिर दर्शन करून आपण संध्याकाळी पिठापूरमध्ये परत येऊन संध्याकाळी ६ वाजता पालखी प्रदक्षिणेचा आनंद घेऊन मंदिरामधील महाप्रसाद घेऊन रात्री पिठापूर मधील रूम किंवा हॉल मध्ये मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
पाचवा दिवस
शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२
सकाळी नाष्टा करून मंदिरामधील अभिषेक कार्यक्रम आटोपून दुपारचे जेवण करून आपण पिठापूर मधील धार्मिक स्थळांचे दर्शन करून संध्याकाळी पालखी प्रदक्षिणा करून रात्रीचे जेवण करून ११ वाजता सामलकोट रेल्वे स्टेशनकडे निघणे.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
सहावा दिवस
रविवार दि. ७ ऑगस्ट २०२२
मध्य रात्रीच्या १.१५ च्या विशाखापट्टणम – मुंबई एक्सप्रेसने पुण्याकडे निघणार आहोत, संपूर्ण दिवसभर रेल्वे प्रवास रात्री ठीक ११.५० मी. पुणे रेल्वे स्टेशनवर आगमन करणे.
जेवण = नाही.
१. सहलीमध्ये जेवण हे साध्या हॉटेलमध्येच असेल, धार्मिक ठिकाणच्या दिवशी संस्थानामधील जेवण असेल.
२. या मध्ये संपूर्ण रेल्वे प्रवास हा रेल्वेच्या स्लीपर क्लासने होईल.
३. स्थळ दर्शनासाठी नॉन एसी गाडी असेल.
४. दररोज एक पाण्याची बाटली दिली जाईल.
५. रेल्वे प्रवासातील चहा, पाणी, नाष्टा आणि जेवण स्वखर्चाने करावा याची नोंद घ्यावी.
६. मुक्काम हा संस्थानाच्या दिलेल्या रूम किंवा हॉल मध्येच असेल याची नोंद घ्यावी.
७. सहलीमध्ये उत्कृष्ट आणि जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतोच.
Inclusion
Charges
Package 1
रुपये ८,४००/- ( रेल्वेच्या स्लीपर क्लासने )
रुपये ११,५००/- ( रेल्वेच्या ३ एसी क्लासने )
५ % gst वेगळा
Tour Dates
2 AUGUST 2022