पहिला दिवस
गुरुवार दि. ६ ऑक्टोबर २०२२
संध्याकाळी ५.२० च्या झेलम एक्सप्रेसने दिल्लीकडे निघणे.
जेवण = नाही.
दुसरा दिवस
शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर २०२२
दिल्ली – हरिद्वार
रात्री १० वाजता दिल्लीमध्ये पोहोचून जेवण करून रात्री बसने हरिद्वारकडे निघणार आहोत.रात्रभर प्रवास.
जेवण = रात्रीचे जेवण.
तिसरा दिवस
शनिवार दि. ८ ऑक्टोबर २०२२
हरिद्वार – बारकोट
सकाळी ठीक ६ वाजेपर्यंत आपण हरिद्वारमध्ये पोहोचून फ्रेश होऊन नाष्टा करून आपण बारकोटकडे निघणार आहोत संध्याकाळी बारकोट मध्ये पोहचून मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
चौथा दिवस
रविवार दि. ९ ऑक्टोबर २०२२
बारकोट – यमुनोत्री – बारकोट
सकाळचा नाष्टा करून आपण गाडीने जानकीचट्टी येथे जाणार आहोत, तेथून यमुनोत्री पर्वताचा ट्रेक चालू होतो हा ट्रेक अंदाजे ६ किमीचा आहे, आपण तेथे चालत किंवा स्व:खर्चाने डोली किंवा घोडा करू शकतो. तेथील गरम पाण्याच्या कुंडा मधे भक्तजन सुती कापडा मधे तांदूळ बांधून शिजवून घेऊ शकतात प्रसाद म्हणून, तेथील गरम पाणी असलेल्या जमुनाबाई कुंडा मधे स्नान करून आपण परत ६ किमीचा ट्रेक करून जानकीचट्टीमध्ये पोहचून गाडीने आपण रात्री ठीक ८ वाजता बारकोट मध्ये पोहचून मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
पाचवा दिवस
सोमवार दि. १० ऑक्टोबर २०२२
बारकोट – उत्तरकाशी
सकाळचा नाष्टा करून आपण उत्तरकाशी कडे निघणार आहोत, अंदाजे गाडीने ५० किमी अंतर कापून आपण महरगाव या ठिकाणी असलेल्या प्राचीन प्रकटेश्र्वर पंच महादेव शिव गुफा येथे पोहोचून शिवगुफा मंदिराकडे जाण्यासाठी अंदाजे ३०० मीटरचा ट्रेक करावा लागणार आहे ,ट्रेक करून आपण आतमध्ये गुहेमध्ये गेल्यावर गुहेमध्ये पाच शिवलिंग आहेत चुनखडी पासून ही गुहा तयार झाली आहे, आत मध्ये गुप्तकाशी गंगा आहे सर्व दर्शन करून आपण उत्तरकाशी कडे निघणार आहोत, दुपारी ठीक १ वाजता आपण उत्तरकाशी मधील हॉटेलमध्ये पोहोचून, दुपारचे जेवण करून आपण संध्याकाळी ठीक ४.३० वाजता उत्तरकाशी विश्वनाथ मंदिर पाहण्यास निघणार आहोत, साधारण २० मिनिटे नंतर मंदिरात पोहोचल्यानंतर दर्शन घेवून आपण संध्याकाळच्या ५.३० वाजताची गंगा आरती पाहणार आहोत. दुपारी २ ते ४ मंदिर बंद असते, गंगा आरती पाहून हनुमानाचे दर्शन घेवून हॉटेलवर परत येवून जेवण करून मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
सहावा दिवस
मंगळवार दि. ११ ऑक्टोबर २०२२
उत्तरकाशी – गंगोत्री – उत्तरकाशी
सकाळचा नाष्टा करून आपण गंगोत्रीकडे निघणार आहोत, गंगोत्री विषयी बोलायचे म्हटले तर गांगणानी या गावी पोहचून तेथे गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून गंगोत्री धाम चे दर्शन करण्यापूर्वी लोक येथे स्नान करूनच पुढे जातात, नंतर पुढे गेल्यावर हर्शिल गावामध्ये पोहचून तेथे राम तेरी गंगा मैली आणि अशा अनेक सिनेमांच्या शूटिंग झाल्या आहेत असो पुढे गेल्यावर आपण गंगा नदी वर असलेला सर्वात उंचीवरील पुल पाहणार आहोत, मंदिरापर्यंत गाडी जाते थोडे म्हणजे ५०० मीटर चालावे लागते, सरळ रस्त्याने १५ मिनिटात आपण मंदिरापाशी पोहोचतो, गंगा नदीचा उगमस्थान येथूनच होतो, दुपारी २ ते ४ मंदिर बंद असते, संध्याकाळी पुन्हा हॉटेलवर परत येवून जेवण करून मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
सातवा दिवस
बुधवार दि. १२ ऑक्टोबर २०२२
उत्तरकाशी – गुप्तकाशी – सीतापुर
सकाळी नाष्टा करून आपण सीतापुरकडे निघणार आहोत, उत्तरकाशी ते सीतापुर हे अंतर अंदाजे २२० किमीचे आहे, म्हणजे संपूर्ण दिवसभर प्रवास राहणार आहे, रात्री अंदाजे ८ वाजता सितापुरमधील हॉटेलमध्ये पोहोचून जेवण करून मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
आठवा दिवस
गुरुवार दि. १३ ऑक्टोबर २०२२
सीतापुर – सिरसी – केदारनाथ
सकाळचा नाष्टा करून आपण गाडीने सिरसी हेलिपॅडकडे जाणार आहोत, गौरीकुंड ते केदारनाथ हा १९ किमीचा ट्रेक आहे, आपण पायी जाऊ शकतो किंवा स्वखर्चाने घोडा किंवा डोली करू शकतो, नाहीतर हेलिकॉप्टरने सुद्धा जाऊ शकतो यात्रेकरूंनी एका रात्रीसाठी लागणारी औषधे, गरम कपडे व वापरायचे कपडे सोबत घ्यावे संध्याकाळी केदारनाथ बाबांची महाआरती करून रात्री केदारनाथ येथे आपण मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
नववा दिवस
शुक्रवार दि. १४ ऑक्टोबर २०२२
केदारनाथ – सिरसी – त्रियुगीनारायण – सीतापुर – पिपलकोटी
सकाळी लवकर उठून नाष्टा करून आपण श्रीकेदारनाथ मंदिराचे दर्शन करून आपण परत १९ किमीचा ट्रेक गौरीकुंड पर्यंत पायी, घोडा किंवा डोलीने करणार आहोत, नाहीतर हेलिकॉप्टरने सुद्धा जाऊ शकतो गौरीकुंडला पोहोचल्या नंतर आपण गाडीने पिपलकोटीकडे जाऊन हॉटेल मधे चेक-इन करून मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
दहावा दिवस
शनिवार दि. १५ ऑक्टोबर २०२२
पिपलकोटी – माना – बद्रीनाथ
सकाळचा नाष्टा करून लवकर बद्रीनाथकडे निघणे दुपारी बद्रीनाथमध्ये पोहोचून आपण माना गाव पाहायला जाणार आहोत, ( मतामूर्ती, चरणपादुका, भीमकुंड व सरस्वती नदीचे मुख ).सर्व स्थळे पाहून झाल्या नंतर तप्तकुंड मदे स्नान करून बद्रीविशालचे दर्शन आपण करणार आहोत, ब्रह्ममहाकाल हे पूर्वजांच्या पिंड दानासाठी महत्वपूर्ण ठिकाण आहे, बद्रीनाथ मंदिरा मध्ये आरती करून रात्री बद्रीनाथ येथे मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
अकरावा दिवस
रविवार दि. १६ ऑक्टोबर २०२२
बद्रीनाथ – पिपलकोटी
पहाटे ४ वाजता उठून गरम कुंडामध्ये अंघोळ करून बद्रीनाथांचे दर्शन करून वाटेमध्ये आपण जोशी मठ दर्शन करून. पिपलकोटीकडे जाऊन हॉटेल मधे चेक-इन करून मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
बारावा दिवस
सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०२२
पिपलकोटी – श्रीनगर – रुद्रप्रयाग – हरिद्वार
सकाळी नाष्टा करून आपण रुद्रप्रयाग मधील धार्मिक स्थळांना भेट देऊन संध्याकाळी हरिद्वारमध्ये पोहचून मुक्काम करणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
तेरावा दिवस
मंगळवार दि. १८ ऑक्टोबर २०२२
हरिद्वार – दिल्ली
सकाळी नाष्टा करून आपण संपूर्ण दिवसभर हरिद्वार आणि ऋषिकेश मधील स्थळ दर्शन करून संध्याकाळी गंगा आरती करून रात्री ११ वा. हरिद्वारमधून रेल्वेने दिल्लीकडे निघणार आहोत.
जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.
चौदावा दिवस
बुधवार दि. १९ ऑक्टोबर २०२२
दिल्ली – पुणे रेल्वे प्रवास
सकाळी ठीक १० च्या झेलम एक्सप्रेसने पुण्याकडे निघणार आहोत.
जेवण = नाही.
पंधरावा दिवस
रेल्वे प्रवास
गुरुवार दि. २० ऑक्टोबर २०२२
दुपारी ३.४० वा. पुणे पोच.
१. पुणे ते पुणे रेल्वे प्रवास समाविष्ट आहे.
२. जेवणाचा कार्यक्रम हा कार्यक्रम पत्रिकेनुसार असेल.
३. दुपारचे जेवण हे स्थळ दर्शनासाठी असल्यामुळे साध्या थाळी पद्धतीने असेल.
४. रूमची व्यवस्था हि साध्यापद्धतीची हॉटेल्स किंवा गेस्ट हाउस मध्ये असेल.
५. चौघांमध्ये एक रूम असेल याची नोंद घ्यावी.
६. केदारनाथमधील रूमची व्यवस्था हि शेरिंग मध्ये असेल.
७. स्थळ दर्शनासाठी २ X २ बस असेल.
८. यात्रा परवाना समाविष्ट आहे.
१. त्रियुगीनारायणला जाण्याचा आणि येण्याचा खर्च अंदाजे ३०० ते ४०० रुपये प्रत्येकी.
२. केदारनाथ हेलिकॅप्टर चा रु. ८८०० खर्च समाविष्ट नाही.
३. रोपवे, प्रवेश फी, घोडा डोली किंवा पॉटर
१. हॉटेल मध्ये चेक इन/चेक आऊट ची वेळ हि दुपारी १२:०० वाजताची असेल.
२. खराब वातावरणा मुळे जर विमान रद्द झाल्यास किंवा वेळ पुढे ढकलल्यास जो काही राहण्याचा किंवा जेवणाचा अतिरिक्त खर्च होईल तो प्रवासी ने स्वतःचा स्वतः करावा त्या खर्चा साठी कार्तिकी टूर्स जबादार असणार नाही.
३. नुब्रा व्हॅली किंवा पॅंगॉन्ग लेक ला जाण्याचा मार्ग जर काही कारणास्थव बंद असल्यास कोणत्याही प्रकारची परतफेड केली जाणार नाही.
४. काही कारणास्थव प्रवासीने कोणत्याही सेवेचा उपभोग न घेतल्यास किंवा प्रवास न केल्यास कोणत्याही प्रकारची परतफेड केली जाणार नाही.
५. एकदा बुक झालेल्या तारखे मध्ये बदल करता येणार नाही.
६. हॉटेल मध्ये चेक इन करताना जश्या रूम् उपलब्ध असतील तश्याच आपल्याला मिळतील जर विशेषतः रूम् बुक करायची असेल तर कार्तिकी टूर्स च्या ऑफिस ला लवकरात लवकर भेट द्यावी किंवा कळवावे.
७. ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% घेतलेली रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.
Inclusion
Charges
Package 1
२९,४०० /- ( केदारनाथ मुक्कामासह )
५ % gst वेगळा
Tour Dates
25-May-2023
&
25-October-2023