12 रात्र आणि 13 दिवस

कैलास मानस सरोवर यात्रा काठमांडू मार्गे ते कैलास मानस सरोवर परिक्रमा काठमांडू येथे समाप्त

पहिला दिवस

बुधवार दि. ७ ऑगस्ट २०२४

पुणे – मुंबई – काठमांडू

                    पुणे ते काठमांडू विमान प्रवास करणे, रात्री काठमांडू हॉटेल मध्ये मुक्काम करणे.

जेवण = रात्रीचे जेवण.

 

दुसरा दिवस

गुरुवार दि. ८ ऑगस्ट २०२४

काठमांडू

                 सकाळी नाष्टा करून पशुपति नाथांचे दर्शन करणे, दुपार नंतर काठमांडू मधील धार्मिक स्थळांचे दर्शन करून रात्री काठमांडू मध्ये मुक्काम करणे.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.  

 

तिसरा दिवस

शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०२४

काठमांडूनेपाळगंज

                सकाळचा नाष्टा करून आपण काठमांडू विमानतळावरून नेपाळगंजकडे निघणे, रात्री नेपाळगंज येथील हॉटेलमध्ये मुक्काम करणे.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

चौथा दिवस

शनिवार दि. १० ऑगस्ट २०२४

नेपाळगंज – सिमीकोट

                 सकाळच्या विमानाने आपण सिमीकोटकडे निघणे, अंदाजे ५० मि. प्रवास करून दुपारी सिमीकोट मधील शिव मंदिराला भेट देऊन रात्री सिमीकोट येथील हॉटेलमध्ये मुक्काम करणे.

जेवण = सकाळचा नाष्टा,दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

पाचवा दिवस

रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४

सिमीकोट – पुरांग

                सकाळी नाष्टा करून हेलीकॅप्टरने अंदाजे अर्धा तासाचा प्रवास करून आपण हिल्सा येथे पोहचणार आहोत समुद्र सपाटी पासून हिल्सा हे ३७०० मी उंचीवर आहे,  सिमीकोट ते हिल्सा हा प्रवास आपल्याला ६ सीटर हेलिकॅप्टरने करायचा आहे, प्रत्येक  यात्रेकरूने आपल्या  सामानाचे वजन हे २० किलोग्रॅम पर्यंतच असावे हे लक्षात ठेवावे, हिल्सा येथे पोहचल्यावर आपल्याला तेथील इमिग्रेशन ऑफिस मधील चीन आणि तिबेट च्या व्हिसासाठी आवश्यक असलेल्या फॉर्मलिटीस पूर्ण करून त्यानंतर आपण हिल्सा ते पुरांग हा प्रवास ३० किमीचा असून तो प्रवास बसने करून वाटेमध्ये आपल्याला दोन चेक पोस्ट येथील फॉर्मलिटीस पूर्ण करून अंदाजे ३ तासानंतर पुरांग येथे संध्याकाळी ४ वा.पोहचून रात्रीचा मुक्काम पुरांग येथील हॉटेल मध्ये करणार आहोत.( दोन्ही चेक पॉईंटला अंदाजे कमीतकमी प्रत्येकी १ तास लागतो याची नोंद घ्यावी.)

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

सहावा दिवस

सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४

पुरांग

                सकाळी नाष्टा करून आपण ह्या दिवशी परिस्थितीची जुळण्यासाठी संपूर्ण दिवसभर विश्रांती करणार आहोत यादिवशी आपण कैलास मानस सरोवरामधील जल घेण्यासाठी लागणारे जलकुंड खरेदी करणार आहोत याची नोंद घ्यावी. रात्रीचा मुक्काम पुरांग येथील हॉटेल मध्ये करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

सातवा दिवस

मंगळवार दि. १३ ऑगस्ट २०२४

पुरांग – मानस सरोवर

               सकाळी नाष्टा करून आपण बसने अंदाजे ३ तासांचा प्रवास करून दुपारी मानस सरोवरावर पोहचणे, पुरांग  ते मानस सरोवर हे अंतर अंदाजे १०५ किमीचे आहे, वाटेमध्ये जात असताना ७० किमीच्या अंतरावर राक्षस तळ येथील एक चेक पॉईंट आपणास पार करावयाचा आहे, राक्षस तळ येथे पोहचल्यावर आपणास गुरला मंधता पर्वताचे दर्शन होते, तेथून आपल्याला कैलास पर्वताचे दक्षिणमुखी पहिले दर्शन होते आणि तेथून पुढे २५ किमीचे अंतर पूर्ण करून आपल्याला मानस सरोवर लागते, दुपारी पोहचल्यावर सरोवरामध्ये अंघोळ करून पूजेचा कार्यक्रम पूर्ण करणार आहोत, रात्री मानस सरोवर येथील गेस्ट हाऊस मध्ये  मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

आठवा दिवस

बुधवार दि. १४ ऑगस्ट २०२४

    मानस सरोवर – डेराफुक
               सकाळचा नाष्टा करून आपण बसने अंदाजे २ तासांचा प्रवास करून दार्चेन मार्ग यम द्वारला पोहचणे ( दार्चेन पासूनच ५२ किमीची खरी कैलास परिक्रमा चालू होते, त्यामध्ये ४२ किमीचे हे अंतर आपल्याला तीन दिवसातच पूर्ण करायचे आहे, मानस सरोवर आणि कैलास परिक्रमा हि एकूण १०२ किमीची आहे, पण आपली खरी अग्नीपरीक्षा हि ४२ किमीची आहे, कारण ती ट्रेक करूनच आपल्याला पार पडायची असते,) असो यमद्वार ते दार्चेन हे अंतर १२ किमीचे आहे ते आपल्याला आजच्या दिवशी कमीत कमी ७ ते ८ तासांचा ट्रेक पूर्ण करून रात्री डेराफुक मध्ये पोहचून रात्री डेराफुक येथील गेस्ट हाऊस मध्ये मुक्काम करणार आहोत. ( डेरापुक हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ४८६० मीटर उंचीवर आहे )

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

नववा दिवस

गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४

डेराफुक – झुथुलफूक

               सकाळी नाष्टा करून निघणे, आजचा दिवस म्हणजे सर्वात धोकादायक ट्रेकिंगचा दिवस हाच दिवस कैलास परिक्रमेचा सर्वात कठीण आहे कारण या दिवशी आपल्याला कमीत कमी १२ तासांचे ट्रेकिंग करायचे आहे आणि ते करणे सर्वांना गरजेचेच आहे,या ठिकाणी कोठेहि मुक्कामाची सोय नाही,असो आपण सकाळी लवकर निघून डोलमा पास ( हे समुद्र सपाटी पासून ५६५० मी उंचीवर आहे ) आणि गौरी कुंड करून रात्री आपल्याला कोणत्याही परिस्थितीत झुथुलफूक येथील गेस्ट हाऊस मध्ये  मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

दहावा दिवस

शुक्रवार दि. १६ ऑगस्ट २०२४

झुथुलफूक – सागा

           सकाळी नाष्टा करून झुथुलफूक ते दार्चेन हा दोन तासांचा ट्रेक करून कैलास परिक्रमा समाप्त करण्याची घोषणा करून आपण दार्चेन मधून बसने सागा कडे निघणार आहोत, संध्याकाळी सागा येथे पोहोचून रात्री गेस्ट हाऊस मध्ये मुक्काम करणार आहोत 

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

अकरावा दिवस

शनिवार दि. १७ ऑगस्ट २०२४

सागा क्युरिंग

            सकाळी नाष्टा करून आपण क्युरिंगकडे निघणार आहोत संध्याकाळी क्युरिंग येथे पोहोचून मुक्काम करणार आहोत. 

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

बारावा दिवस

रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४

क्युरिंग काठमांडू

             सकाळी नाष्टा करून आपण नेपाळ आणि चीन बॉर्डरवर पोहोचून इमिग्रेशन करून आपण संध्याकाळी काठमांडू मध्ये पोहोचून मुक्काम करणार आहे.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

तेरावा दिवस

सोमवार दि. १९ ऑगस्ट २०२३

काठमांडू ते मुंबई / पुणे

            सकाळी नाष्टा करून आपण काठमांडू विमानतळावरून पुण्याकडे निघणे.

जेवण = सकाळचा नाष्टा.

Important information

Inclusions

  • नेपाळगंज ते सिमीकोट हा प्रवास विमानाच्या इकोनॉमी क्लासने करण्यात येईल.
  • संपूर्ण स्थळ दर्शन करण्यासाठी एसी बस असेल.
  • हॉटेलचे किंवा गेस्ट हाऊसचे वास्तव्य हे उत्तम प्रतीचे आणि वातानुकुलीत रूम असेल, रूमचे वाटप हे दोघांमध्ये एक रूम असणार आहे याची नोंद घ्यावी.
  • ज्या हॉटेल मध्ये आपण राहणार आहोत त्या हॉटेल मध्ये सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण असेल, दुपाचे जेवण हे शेर्फा मार्फत सर्व जेवण साहित्य बरोबर असणार, जेवण हे शुद्ध शाकाहारी आणि हायजिनिक जेवण असेल.
  • तिबेटचा साधारण विसा फी आणि परवाना समाविष्ट आहे.
  • तिबेट मध्ये इंग्रजीत बोलणारा गाईड असेल.
  • ऑक्सिजन सिलेंडर बरोबर असेल.

Exclusions

  • पुणे ते काठमांडू रेल्वे प्रवास / विमान प्रवास / बस प्रवास समाविष्ट नाही.
  • काही कारणास्तव हवामानातील बदल, संप, नैसर्गिक आपत्ती तसेच इतर अशा अनेक कारणांमुळे आपला पुढचा कार्यक्रम बदलु शकतो तेव्हा आपली एखादी रात्र वाढू शकते एक रात्र जरी वाढली तरी पुढचा प्रवासाचे लागणारे अधिक विमानभाडे, गाडी खर्च, हॉटेल खर्च, चहा, नाष्टा आणि जेवणाचा वेगळा खर्च आकारण्यात येईल, कारण ते आमच्या आवाक्या बाहेरचे असेल.
  • विमान / रेल्वे प्रवास समाविष्ट नाही.
  • याक आणि हमालीचा खर्च ट्रेक करताना स्वतः करावयाचा आहे.
  • रेस्क्यू ऑपेरेशन, निर्वासन आणि प्रवासी विमा समाविष्ट नाही.
  • आपल्या ग्रुप मधील कोना एकाला वाईट हवामानाचा त्रास होत असल्यास त्याला पुन्हा परत पाठवायचा खर्च या मध्ये समाविष्ट नाही.
  • आपल्या यात्रे व्यतिरिक्त इतर कुठलाही खर्च समाविष्ट नाही.

Terms and Conditions

कैलास यात्रा बुकिंग साठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे

* पासपोर्ट हा ६ महिने वैध असावा

* वयाची पातळी हि १० वर्षे ते ६९ वर्षे वयाची असावी.

* तुमचा स्कॅन केलेला पासपोर्ट हा प्रवास करण्याच्या ६० दिवस आधी कार्तिकी टूर्स च्या ऑफिस मध्ये आणून द्यावा.

* ओरिजिनल पासपोर्ट हा प्रवास करण्याच्या ३० दिवस आधी कार्तिकी टूर्स च्या ऑफिस मध्ये आणून द्यावा.

 

यात्रेची रक्कम कशा पध्द्तीने करावी पुढील प्रमाणे

* २५ % रक्कम यात्रा बुकिंग करतेवेळी भरावी.

* ५०% रक्कम ही प्रवास करण्याच्या ३० दिवस आधी ओरिजिनल पासपोर्ट जमा करते वेळी कार्तिकी टूर्स च्या बँक खात्यामध्ये भरावी.

* आणि बाकीची राहिलेली पूर्ण रक्कम हि यात्रेला निघण्याआधी २० दिवस भरावी.

 

 

 

 

यात्रा रद्द करण्याचे धोरण

* यात्रा रद्द करण्याचे कारण लेखी पद्धतीने कार्तिकी टूर्स च्या ऑफिस मध्ये आणून द्यावे.

* यात्रा रद्द करण्याचे कारण तोंडी सांगितले तर ग्राह्य धरण्यात येणार नाही.

* यात्रेला निघण्याच्या ३० दिवसांपूर्वी यात्रेच्या पूर्ण रकमेच्या १०% रक्कम हि वजा करण्यात येईल ( विमान प्रवास भाडे सोडून )

* यात्रेला निघण्याच्या १५ दिवसांपूर्वी यात्रेच्या पूर्ण रकमेच्या २५% रक्कम हि वजा करण्यात येईल ( विमान प्रवास भाडे सोडून )

* यात्रेला निघण्याच्या १० दिवसांपूर्वी यात्रेच्या पूर्ण रक्कम हि वजा करण्यात येईल ( विमान प्रवास भाडे सोडून )

 

अटी आणि नियम

             यात्रेला निघण्यापूर्वी बुकिंगचे नियम आणि अटी महत्वाच्या आहेत त्या तुम्ही काळजी पूर्वक वाचून आणि समजून घेणे कारण त्या अटी आणि नियम यात्रेमधील सर्व सेवेवर निर्धारित आहे त्या सर्व सेवा तुम्हाला कार्तिकी टूर्स पुरवणार आहेत.

* प्रवासी विमा = आम्ही तुम्हाला सांगू इच्छुक आहे कि प्रवासी विमा हा कार्तिकी टूर्सकडून काढणे गरजेचे आहे,त्या प्रवासी विमामध्ये आपल्याला मेडिकल,नैसर्गिक आपत्ती,प्रवासी अपघात तसेच काही कारणास्तव यात्रा रद्द झाल्यास आपणास त्याचा विमा कंपनीकडून लाभ घेता येतो.

* यात्रेमधील बदल = काही कारणास्तव यात्रेकरूकडून त्याच्या यात्रे मध्ये बदल घडवायचा असेल तर आम्हाला यात्रेच्या ४० दिवसांपूर्वी कार्तिकी टूर्सच्या ऑफिस मध्ये स्वतः येऊन कळवावे.कोणत्याही प्रकारचे बदल घडवल्यास जे काही अतिरिक्त खर्च होतील ते यात्रेकरूला द्यावा लागेल.

* यात्रा कंपनीने काही यात्रा रद्द केल्यास = आम्हाला हा अधिकार आहे कि जर तिबेट किंवा चीनची सीमा बंद/चीन आणि तिबेट च्या सरकार कडून काही कारणास्तव तुमचे यात्रेचे परमिट/व्हिसा मिळाले नाही किंवा त्यांनी यात्रेच्या ऐनवेळेस यात्रेचे परमिट/व्हिसा रद्द केले तर,युद्ध परिस्थिती/करफू/नैसर्गिक आपत्ती/आतंकवादी हमला किंवा धमक्या/ विमानतळ बंद यांपैकी कोणत्याही प्रकारची आपत्ती उध्दभवल्यास आम्ही तुम्हाला असे सुचवतो कि त्या बदल्यात यात्रेकरूंला दुसऱ्या प्रकारची सहल पुरवण्यात येईल किंवा आम्ही यात्रेचा परतावा हा विमान,व्हिसा,परमिट,हॉटेल आणि गाडीचे पैसे वजा करून तुम्हाला बाकीचा खर्च देण्यात येईल.जो काही खर्च वजा करण्यात आला आहे त्यात्याचे आम्ही रीतसर बिल तुम्हाला देण्यात येईल मग तुम्ही तुमच्या विमा कंपनीकडे क्लैम साठी अर्ज करू शकता.ह्या व्यतरिक्त आम्ही तुम्हाला कोणतेही देणे देण्यास बांधील नाही.काही वेळा असे होते कि तुमच्याकडे परमिट/व्हिसा असला तरी सुद्धा चीनच्या इमिग्रेशन अधिकाऱ्याला जर असे आढळले तर तुम्ही यात्रा पूर्ण करण्यास योग्य नाही त्यावेळी तुमची यात्रा रद्द करण्याचा हक्क हा पूर्णपणे चीनच्या सरकारला आहे,कृपया आम्ही असे सुचवतो कि जो पर्यंत तुम्हाला पक्के परमिट मिळत नाही तो पर्यंत तुम्हाला यात्रा करता नाही येणार याची जबाबदारी आमच्यावर नसेल याची नोंद घ्यावी.  

* यात्रेचा रिफंड  = अशा वेळेस तुमची यात्रा पूर्ण न झाल्यास कोणत्याही प्रकारचा रिफंड आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही.

* खाजगी  = कार्तिकी टूर्स कडून तुम्हाला सांगण्यात येते कि प्रत्येक यात्रेकरूंची खाजगी माहिती हि गोपनीय राहील.

* नियमांमधील बदल आणि अटी = कार्तिकी टूर्स कडून तुम्हाला सांगण्यात येते कि ऐनवेळेस यात्रेमध्ये अचानकपणे कोणत्याही प्रकारचा बदल घडवण्याचा अधिकार कंपनीला असेल.

*  वयाची अट =  कमीतकमी १० वर्षे ते जास्तीत जास्त ६९ वर्षे ही वयाची अट आहे

यात्रेला निघण्या पूर्वीची महत्वाची माहिती पुढील प्रमाणे –

  • पोशाख = तिबेट मध्ये असताना साधे आणि सुटसुटीत कपडे आणि चालण्यास योग्य असतील अशी बूट असावेत,रात्री आणि सकाळी थंडीचे वातावरण असते त्यामुळे सोबत उबदार कपडे घेणे बंधनकारक आह. भारतीय महिला यात्रेकरूंना असे सांगण्यात येते कि पूर्ण यात्रेमध्ये साडीचा वापर करू नये.तुम्हाला लागणारी औषधे,आणि वैयक्तिक टॉयलेट खुर्ची घेणे आवश्यक आहे.तर तुम्ही छोटे प्रथमोपचार किट सोबत घेणे सुलभ असते.तसेच यात्रेचा संपूर्ण नकाशा जवळ बाळगावा त्याने तुम्हाला समजते कि रोजच्या प्रवासात तुम्ही स्वतः कुठे आहात आणि पुढे किती प्रवास करावयाचा आहे याचा अंदाज घेता येतो.
  • सोबत घ्यावयाच्या वस्तू = हिवाळ्याचे उबदार कपडे,रेनकोट,जॅकेट,स्वेटर,हात मोजे,कान टोपी,मोजे,टोपी,चालण्यास योग्य असतील अशी बूट,स्कार्फ,सन ग्लासेस सूर्याच्या घातक किरणापासून बचावासाठी UV गॉगल्स घेणे आवश्यक आहे,छत्री इ. तसेच आपल्या सोबत खायच्या गोष्टी पैकी चॉकलेट,ड्राय फ्रुट,गोळ्या,ग्लुकोज पावडर,नमकीन,कडक आवरण असलेली पाण्याची बाटली,पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्या,DIAMOX टॅबलेट उंच वातावरणाच्या दबावासाठी,त्वचा रक्षणासाठी योग्य क्रीम,वेट टीसु,बॉडी स्प्रे,टॉयलेट पेपर,बॅटरी तसेच त्याचे जास्तीचे सेल,शोल्डर बॅग,दुर्बीण,कॅमेरा इ.
  • आरोग्य = हि यात्रा जगातील सर्वात उंचीवर घडणारी यात्रा आहे,त्यासाठी तुमची शाररिक क्षमता प्रबळ पाहिजे,साधारणतः दम्याचे आणि हृद्य विकाराचे रुग्णांनी हि यात्रा टाळावी,जर तुम्ही यात्रेसाठी इच्छुक असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जाऊन तुमची योग्य त्या प्रकारची शाररिक तपासणी करून तुमचे शरीर हे उच्च दबावाच्या वातावरणाशी साथ देण्यासारखे आहे का याची पूर्ण तपासणी करण्याची अत्यंत महत्वाची गरज आहे कारण तेथे उच्च वातावरणाच्या दबावामध्ये यात्रेकरूला प्रवास करावयाचा असतो.
  • उच्च वातावरणातील आजार = जसे कि तुम्ही उंची वर प्रवास करत असताना तुम्हाला अशी जाणीव होईल कि डोकेदुखी,दम लागणे,झोप न येणे,थकवा येणे,हे प्रकार उद्भवतील जो पर्यंत तुमचे शरीर हे त्या वातावरणाशी पूर्ण पने अनुकूल होत नाही तो पर्यंत.त्या वातावरणाशी अनुकूल होण्यासाठी तुमच्या शरीराला दोन दिवस लागू शकतात,पण प्रत्येकाच्या शरीर क्षमतेवर ते अवलंबून असते, त्यासाठी आपण मानसरोवराला दोन रात्र राहणे अनिवार्य आहे.

                             वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी खूप प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे,यात्रेकरूंना दारू पिणे, सिगारेट ओढणे बंधनकारक आहे,आम्ही तुम्हाला  गामोव बॅग यात्रेमध्ये उपलब्ध करून देतो जे तुमचा उच्च वातावरणाच्या दबावामध्ये साथ देते.

  • चलन = चीनचे चलन हे युवान म्हणून ओळखले जाते, USD १ = ६.४८ युवान असे होय. आणि १ युवान = १०.२८ रुपये असे होय. २०१५ च्या डिसेंबर नुसार आहे. चलन हे आमच्या कार्तिकी टूर्सच्या ऑफिस मधून बदलले जाईल.
  • जोखीम आणि जबाबदाऱ्या = कार्तिकी टूर्स पुणे यांच्याकडून पूर्ण पणे प्रयत्न केले जातील कि तुमची यात्रा हि आनंददायी आणि व्यवस्तीत रित्या पार पडली जाईल,तिबेट मधील यात्रा हि तिबेटच्या कडक नियमांनुसार पार पडली जाईल,कार्तिकी टूर्स कडून यात्रेमधील जबाबदारी विशेष म्हणजे नैसर्गिक आपत्ती जसे कि रोड बंद होणे,दरड कोसळणे,पूर येणे,बर्फ अति वृष्टी होणे,राजकीय घडामोडी तसेच विमान रद्द झाल्यास,यात्री आजारी पडणे,विमानाला उशीर होणे किंवा अपघात होणे,अशा वेळी आर्थिक आणि मानसिक दृष्टया जी जबाबदारी आणि अचानक उद्भवणारा खर्च हा यात्रेकरूला करावा लागतो.

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

सहलीची रक्कम प्रत्येकी १,९५,०००/-

Tour Dates

7 August 2024

Payment / Cancelation Information

  1. ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% रक्कम घेतली जाईल ती रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.
  2. बाकीची ७५% रक्कम हि प्रवासाची जी तारिख असेल त्या तारखेच्या १५ दिवस आधी घेतली जाईल.
  3. जर तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या १५ दिवस आधी बुकिंग रद्द करायचे असेल तर १००% रक्कम आकारली जाईल.