१० रात्र आणि ११ दिवस

Assam, Meghalaya and Arunachal tour package

गुवाहाटी, शिलाँग, चेरापुंजी, मौलिन्नोंग व्हिलेज, काझिरंगा अभयारण्य, बोम्डीला, तवांग, दिरांग आणि कामख्या देवी

पहिला दिवस

सोमवार दि. २७ नोव्हेंबर २०२३

गुवाहाटी – शिलाँग

            गुवाहाटी विमातळावर किंवा रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या नंतर आपण गाडीने शिलाँगकडे निघणार आहोत, गुवाहाटी विमानतळ ते शिलाँग हे अंतर १२० किमीचे आहे अंदाजे पोहोचण्यासाठी ४ तास लागतात, शिलाँग हे शहर मेघालय राज्याची राजधानी आहे, शिलाँग शहराकडे जात असताना वाटे मध्ये उमीयम लेक आपण पाहणार आहोत, नंतर आपण शिलाँग येथील हॉटेल मध्ये जाऊन चेक-इन करून रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवन = रात्रीचे जेवण.

दुसरा दिवस

मंगळवार दि. २८ नोव्हेंबर २०२३   

शिलाँग – मौलिन्नोंग – शिलाँग

             सकाळी नाष्टा केल्या नंतर आपण मौलिन्नोंग गावाला भेट देण्यासाठी जाणार आहोत, मौलिन्नोंग हे गाव एशिया खंडातील सर्वांत स्वच्छ गांव म्हणून ओळखले जाते, तसेच आपण तेथे बैलेंसिंग रॉक आणि लिविंग रूट ब्रिज म्हणजे जीवंत झाडाच्या मूळापासून विणून बनवलेले कित्तेक दशकांपूर्वीचे मानव निर्मित पूल आपण पाहणार आहोत, नंतर आपण भारत बांग्लादेश सीमेवर असलेल्या दावकी नदीला भेट देणार आहोत काचेसारखी पारदर्शक नदी कल्पनेच्याही पलिकड स्वच्छ असलेली या नदीत तुम्हाला कचऱ्याचा एक कपटाही दिसणार नाही. नदीचं पाणी एवढं स्वच्छ आहे की तुम्ही थेट नदीचा तळ पाहू शकता. नदीतील खडक आणि मासेही पाहू शकता, तसेच दावकी नदी वरील दावकी ब्रीज पाहून आपण परत शिलाँग मध्ये येऊन रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

तिसरा दिवस

बुधवार दि. २९ नोव्हेंबर २०२३

शिलाँग – चेरापूंजी – शिलाँग

              सकाळी नाष्टा करून आपण शिलाँग पीक आणि एलिफेंट फॉल्स पाहणार आहोत, नंतर आपण चेरापूंजी कडे निघणार आहोत, चेरापूंजीला सोहरा म्हणून पण ओळखले जाते, शिलाँग ते चेरापूंजी हे अंतर ५४ किमीचे आहे पण घाट प्रवास असल्या मुळे पोहोचण्यासाठी २ तास लागतात, पोहोचल्या नंतर आपण मावसमई केव्हस्, सेवेन सिस्टर फॉल्स, एको पार्क आणि नोहकालिकाई फॉल्स पाहणार आहोत हा धबधबा १२०० फूट उंच आहे, हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे, परतीच्या वाटे वरती आपण लाइतलूम ग्रँड कॅनन येथे सूर्यास्त बगण्यासाठी आपण जाणार आहोत, नंतर आपण परत शिलाँग येथील हॉटेल मध्ये येऊन रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = नाष्टा  आणि रात्रीचे जेवण.

चौथा दिवस

गुरुवार दि. ३० नोव्हेंबर २०२३

शिलाँग – काझिरंगा

             सकाळी नाष्टा केल्या नंतर कॅथेड्रल ऑफ मेरी या चर्चला आपण भेट देऊन पुढे आपण काझिरंगा राष्ट्रीय उद्यान जिथे वन्य जीवन निर्भयपणे फिरतात आणि निसर्गासह सुंदर लहरींचा आनंद घेतात, शिलाँग ते काझिरंगा हे अंतर २५४ किमीचे आहे, अंदाजे ६ तासाचा हा प्रवास असेल, पोहोचल्या नंतर आपण हॉटेल मध्ये चेक-इन करून आराम करणार आहोत.

जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

पाचवा दिवस

शुक्रवार दि. १ डिसेंबर २०२३  

काझिरंगा

            सकाळी नाष्टा केल्यानंतर आपण काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये थरारक अशी जंगल जीप सफारी करणार आहोत, आपण समोरा समोर जग प्रसिद्ध असा आणि दुर्मिळ असणारा एक शिंगी गेंडा, हत्ती, हरिण आणि दुर्मिळ प्रवासी पक्षी आपण जीप सफारी मध्ये पाहणार आहोत, नंतर आपण ऑर्किड पार्कला भेट देणार आहोत, येथे एक ऑर्किड हाऊस आहे जेथे ऑर्किड फुलाच्या ईशान्य भारतातील ६०० पेक्षा जास्त प्रजाती संग्रहित केलेल्या आहेत, बांबू आणि मेडीसिनल हर्ब गार्डन, कॅक्टस हाऊस आणि हँडीक्राफ्ट म्यूजियम(हस्तकला संग्रहालय) पाहून संध्याकाळी आपण नेत्रदीपक असे सांस्कृतिक बीहू नृत्य आणि आसाम मधिल भारतीय लोकनृत्य पाहून विश्रांती करणार आहोत.

जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

सहावा दिवस

शनिवार दि. २ डिसेंबर २०२३

काझिरंगा – बोम्डीला

            सकाळी नाष्टा केल्यानंतर आपण बोम्डीला कडे निघणार आहोत म्हणजेच आपले तिसरे राज्य अरुणाचल प्रदेशकडे निघणार आहोत, काझिरंगा ते बोम्डीला हे अंतर २०० किमीचे आहे, संध्याकाळी ४ वाजता आपण बोम्डीलामध्ये पोहोचून बुद्धीष्ट मोनस्ट्रीपाहून संध्याकाळी लोकल मार्केटला भेट देवून रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

सातवा दिवस

रविवार दि. ३ डिसेंबर २०२३

बोम्डीला – तवांग

             सकाळी नाष्टा करून आपण सुंदर अशा फळांच्या बागा पाहून निसर्गरम्य व्हॅलीचे दर्शन करून आपण तवांगकडे निघणार आहोत, हिमालयाच्या मोठमोठ्या पर्वत रांगामधून पुढे गेल्यावर आपल्याला नॉर्थ इस्ट मधील अतिशय उंचीवरील गाडी जाणाऱ्या सेला पास पार करून पुढे जायचे आहे सेला पास हा समुद्र सपाटीपासून १३७०० फुट उंचीवर आहे, पुढे वाटेमध्ये आपण नुरानंग धबधबा आणि जसवंत गड वार मेमोरियल पाहणार आहोत, पुढे आपण संध्याकाळ पर्यंत तवांगमध्ये पोहोचणार आहोत, तवांग हे शहर पर्वतामध्ये आहे, येथेच आपल्याला १९६२ साली झालेल्या भारत चीन युध्याच्या आठवणी जाग्या होतात. संध्याकाळी आपण आपल्या हॉटेलमध्ये जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

आठवा दिवस

सोमवार दि. ४ डिसेंबर २०२३

तवांग

              सकाळी नाष्टा करून आपण शोन्ग्ला सर सरोवर ( माधुरी सरोवर ) पाहणार आहोत, नंतर आपण बुमला पासकडे जाणार आहोत, तवांग पासून साधारण ३७ किमीच्या अंतरावर आहे, इथे भारत आणि चीनची बोर्डर आहे समुद्र सपाटीपासून १५२०० फुट उंचीवर आहे बुमला पास हे सर्व पाहून आपण पुन्हा आपल्या हॉटेलवर परत येवून जेवण करून मुक्काम करणार आहोत ( हे स्थळ दर्शन करण्यासाठी आपल्याला तेथील लोकल गाडीने करावे त्याचा खर्च हा अतिरिक्त आहे आणि त्यासाठी भारतीय सेनेची परवानगी लागते रस्ता ओपन असल्याची)

जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

नववा दिवस

मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३

तवांग – दिरांग

             सकाळी नाष्टा करून आपण दिरांगकडे निघणार आहोत, दिरांग हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले शहर आहे  संध्याकाळी ४ वाजता आपण दिरांग मध्ये पोहोचून आपण तेथील तिबेटीयन मोनस्ट्री पाहणार आहोत, हे तिबेटीयन गाव म्हणून ओळखले जाते, या गावात आपण गरम पाण्याचे कुंद पाहून रात्री दिरांग मधील हॉटेल मध्ये जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

दहावा दिवस

बुधवार दि. ६ डिसेंबर २०२३

दिरांग – गुवाहाटी

             सकाळी नाष्टा करून आपण गुवाहाटीकडे निघणार आहोत,संपूर्ण दिवसभर प्रवास करून संध्याकाळी आपण कामाख्या मंदिराला भेट देणार आहोत, हे मंदिर आसामची राजधानी गुवाहाटी (गोहत्ती) येथे आहे. शक्तिदेवता सतीचे हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे. मंदिर दगडात कोरले आहे. देवीची प्रतिमा आहे. तिथेच देवीची वस्त्रे, आभूषणे, भोग चढविला जातो. एका डोंगरावर असलेल्या या मंदिराचे तांत्रिक शास्त्रात विशेष महत्त्व आहे. हे देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक असून येथील देवी योनी स्वरूपात आहे, नंतर उमानंद देवळोई हे शिव मंदिर आपण पाहणार आहोत हे मंदिर ब्रह्मपुत्र नदीच्या मध्यभागी उमानंद बेटावर आहे, हे जगातील सर्वात लहान रहिवासी नदीचे बेट म्हणून ओळखले जाते, नंतर आपण ब्रह्मपुत्र नदीमध्ये रिवर क्रुज ने फिरणार आहोत. ( रिवर क्रुझ खर्च अतिरिक्त आहे )

जेवण = नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

अकरावा दिवस

गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३

गुवाहाटी – मुंबई – पुणे

              सकाळी नाष्टा करून आपण गुवाहाटी मधील स्थळांना भेट देणार आहोत, सर्व प्रथम आपण आसाम फिल्म म्युझियम ला भेट देणार आहोत, तिथे तुम्हाला आसामी सिनेमाचा इतिहास समजेल, नंतर आपण GTAC चहा लोंज पाहणार आहोत तिथे आपण चहा पावडर ची खरेदी करून संध्याकाळी आपण रेल्वे स्टेशन किंवा विमानतळाकडे निघणार आहोत.

जेवण = नाष्टा.

Important information

Inclusions

  • कार्यक्रम पत्रीके नुसार सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण असेल.
  • हॉटेल वास्तव्य हे दोघांमध्ये किंवा तिघांमध्ये एक रूम असेल.
  • रोज एक लिटर पाण्याची बाटली दिली जाईल.
  • संपूर्ण स्थळ दर्शन बसने करण्यात येईल.
  • टोल टॅक्स, पार्किंग, ड्राइवरचा भत्ता समाविष्ट आहे.

Exclusions

  • विमान प्रवास समाविष्ट नाही.
  • रेल्वे प्रवास खर्च समाविष्ट नाही.
  • कोणत्याहि प्रकारचे वैयक्तिक खर्च किंवा अतिरिक्त भोजन.
  • कोणत्याही प्रकारच्या बागेमधील फी समविष्ट नाही.
  • दावकी नदीमधील बोटीचा खर्च समाविष्ट नाही.
  • काझिरंगा वाईल्ड सेन्चुरी मधील सफारीचा खर्च समाविष्ट नाही.
  • बुमला पास साठी गाडी खर्च.
  • ब्रह्मपुत्रा नदीमधील रीवर क्रुझ.
  • वैद्यकीय प्रवासी विमा.
  • प्रवासा मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केल्यास उदभवणारे खर्च.
  • विमान / रेल्वे रद्द झाल्या मुळे किंवा रोड ब्लॉक झाल्या मुळे होणार अतिरिक्त खर्च इत्यादी.

Terms and Conditions

  • हॉटेल मध्ये चेक इन/चेक आऊट ची वेळ हि दुपारी १२:०० वाजताची असेल.
  • खराब वातावरणा मुळे जर विमान रद्द झाल्यास किंवा वेळ पुढे ढकलल्यास जो काही राहण्याचा किंवा जेवणाचा अतिरिक्त खर्च होईल तो प्रवासी ने स्वतःचा स्वतः करावा त्या खर्चा साठी कार्तिकी टूर्स जबादार असणार नाही.
  • काही कारणास्थव प्रवासीने कोणत्याही सेवेचा उपभोग न घेतल्यास किंवा प्रवास न केल्यास कोणत्याही प्रकारची परतफेड केली जाणार नाही.
  • एकदा बुक झालेल्या तारखे मध्ये बदल करता येणार नाही.
  • हॉटेल मध्ये चेक इन करताना जश्या रूम् उपलब्ध असतील तश्याच आपल्याला मिळतील जर विशेषतः रूम् बुक करायची असेल तर कार्तिकी टूर्स च्या ऑफिस ला लवकरात लवकर भेट द्यावी किंवा कळवावे.
  • ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% घेतलेली रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

रु. ४७,५००/-  प्रत्येकी डबल शेरिंग प्रमाणे

४५,७००/-  प्रत्येकी ट्रिपल शेरिंग प्रमाणे

Tour Dates

 

Payment / Cancelation Information

  1. ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% रक्कम घेतली जाईल ती रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.
  2. बाकीची ७५% रक्कम हि प्रवासाची जी तारिख असेल त्या तारखेच्या १५ दिवस आधी घेतली जाईल.
  3. जर तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या १५ दिवस आधी बुकिंग रद्द करायचे असेल तर १००% रक्कम आकारली जाईल.