सिंगापूर, मलेशिया आणि बाली १० रात्र आणि ११ दिवस

सिंगापूर, मलेशिया आणि बाली सहल

पहिला दिवस

पुणे – मुंबई – सिंगापूर

              मध्य रात्रीच्या मुंबई विमानतळावरून सिंगापूरकडे निघणे सकाळी ७ वाजता सिंगापूर विमानतळावर पोहोचून इमिग्रेशन चेक करून सिंगापूर हॉटेलकडे निघणे हॉटेल लोबीमध्ये फ्रेश होऊन सिंगापूर सिटी टूरचा आनंद घेवून संध्याकाळी गार्डन बाय द बे पाहून जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = रात्रीचे जेवण. 

 

दुसरा दिवस

सिंगापूरसेंटोसा आयलंड –  सिंगापूर

             दुपार नंतरून आपण फेबर पर्वतावरून रोपवे ने सेंटोसा आयलंड वरती जाणार आहोत, त्यानंतर आपण वॅक्स संग्रहालय पाहणार आहोत, त्या नंतर आपण मोनोरेल चा आनंद घेणार आहोत, संध्याकाळी विंग्ज ऑफ टाइम्स पाहून रात्री हॉटेल वरती जाऊन जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.   

 

तिसरा दिवस

सिंगापूरयुनिव्हरर्सल स्टुडिओ –  सिंगापूर

              सकाळी आपण प्रसिध्द असलेला युनिव्हरर्सल स्टुडिओ पाहणार आहोत, त्या मध्ये रोमांचक असे कार्यक्रम, ट्रान्सफॉर्मर्स, वॉटर वर्ल्ड, जुरासिकपार्क पाहून दुपारचे जेवण करून नंतर अशिया खंडातील सर्वात मोठे एक्वारीअम पाहणार आहोत तसेच त्या मध्ये खाऱ्या पाण्यातील दुर्मिळ अश्या असलेल्या प्रजाती सुद्दा आपण पाहणार आहोत, त्या नंतर संध्याकाळी लाईट आणि वॉटर शो पाहणार आहोत, रात्री चे जेवण करून हॉटेल वरती मुक्काम करणार आहोत.

 जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. 

 

चौथा दिवस

सिंगापूर – कोलालंपूर

             सकाळी नाष्टा करून आपण बसने कोलालंपूरकडे निघणार आहोत अंदाजे ७ तासांचा प्रवास करून संध्याकाळी कोलालंपूर मधील हॉटेल मध्ये पोहचून रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत.   

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

 

पाचवा दिवस

कोलालंपूरजेन्टिंग हायलंडकोलालंपूर

               सकाळी नाष्टा करून आपण बाटु केव्ह पाहण्यासाठी जाणार आहोत तेथे कार्तिक स्वामींचे मंदिर आपण पाहणार आहोत, त्या नंतर दुपारचे जेवण करून आपण जेन्टिंग हायलंड येथील सर्वात लांब व सर्वात वेगवान अश्या रोपवे ने जेन्टिंग हायलंड येथे जाणार आहोत, नंतर हॉटेल वरती जाऊन जेवण करून जेटिंग हायलंड मधील हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.   

 

सहावा दिवस

कोलालंपूर सिटी टूर – मुंबई – पुणे – किंवा बाली मुक्काम                    

              सकाळी नाष्टा करून आपण कोलालंपूर सिटी टूर करणार आहोत, त्या मध्ये आपण कोलालंपूर टॉवर वरतून आश्चर्यकारक असे दिसणारे सिटी पॅलेस आपण पाहणार आहोत, त्यानंतर आपण हायकोर्ट बिल्डिंग पाहणार आहोत, तसेच कोलालंपूर सिटी सेन्टर आणि पेट्रोनस ट्विन टॉवर सुद्दा आपण पाहणार आहोत नंतर आपण कोलालंपूर विमानतळाकडे निघणार आहोत मलेशिया विमानतळावरून  आपण बालीकडे निघणे.रात्री उबुद मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवन.

 

सातवा दिवस

उबुद  – किंतामणी ज्वालामुखी – उबुद

             सकाळी नाष्टा केल्या नंतर आपण पूर्ण दिवस स्थळ दर्शनासाठी निघणार आहोत, सेलूक या ठिकाणी आपण चांदीचे अलंकार व मास व्हिलेज येथे लाकूड हस्तकला पाहून पुढे आपण किंतामणी ज्वालामुखी पाहण्यासाठी निघणार आहोत पोहोचल्या नंतर आपण किंतामणी ज्वालामुखी लांबून पाहणार आहोत, पुढे आपण तंपक सिरिंग येथे पवित्र झऱ्याचे पाणी पाहून पुढे टेगलालंग येथील पारंपरिक तांदूळ शेती पाहून उबूड येथे पारंपारिक बाजार मदे स्थानिक वस्तू मोलभाव किंमती मध्ये मिळतात. रात्री उबुद मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

आठवा दिवस

उबुद – लॅम्बोगंन बेट

             सकाळी नाष्टा झाल्या नंतर आपण स्पीड बोट ने लॅम्बोगंन बेटाकडे निघणार आहोत, लॅम्बोगंन बेटावर पोहोचल्या नंतर आपण हॉटेल मध्ये चेक-इन करून आपण पूर्ण दिवस आराम करणार आहोत, किंवा आपण जवळील समुद्र किनाऱ्याला स्वतः भेट देणार आहोत, नंतर आराम करून रात्रीचे जेवण करून आपण लॅम्बोगंन बेट येथील हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

नववा दिवस

लॅम्बोगंन नुसा पेनडीआ टूरलॅम्बोगंन

             सकाळी नाष्टा झाल्या नंतर आपण नुसा पेनडीआ कडे बोटीने प्रवास करणार आहोत, आपण तेथील पारंपरिक गाव पाहणार आहोत, तसेच आपण तेथील उवाग समुद्र किनाऱ्याचा थोडावेळ आनंद घेणार आहोत, तेथील समुद्र खडक कमानी, उष्णकटिबंधीय पाणी व समुद्र स्नानाचा आनंद घेणार आहोत तसेच तोया पाकेह गावातील स्थानिक जीवनाची झलक आपण घेणार आहोत, परत हॉटेल मध्ये येऊन रात्रीचे जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

दहावा दिवस

लॅम्बोगंन बेट – उलुवाटू – केकयाक डांस तनहा लॉट सनसेट

            सकाळी नाष्टा झाल्या नंतर आपण हॉटेल मधून चेक-आऊट करून आपण स्पीड बोट ने बाली कडे निघणार आहोत, दुपारी हॉटेल मध्ये पोहोचून चेक-इन करून नंतर संध्याकाळी आपण प्राचीन उलुवाटू मंदिर पाहणार आहोत. नंतर आपण केकयाक डांस (पारंपरिक नृत्य) पाहणार आहोत. जवळच आपण १७व्या शतकातील ऊलुन दानू मंदिर पाहणार आहोत हे मंदिर बेरतान तलावावरती बनवले आहे, नंतर आपण तनहा लॉट ह्या मंदिरा येथून जगप्रसिद्ध असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सुर्यास्थाचा आनंद घेणार अहोत. रात्री आपण कुटा येथील हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

 जेवण = सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

अकरावा दिवस

बाली – मुंबई

              मुंबईकडे प्रस्थान.

जेवण = सकाळचा नाष्टा.

Important information

Inclusions

  • पुणे ते सिंगापूर हा विमानाच्या इकोनॉमी क्लासने करण्यात येईल.
  • कोलालंपूर ते मुंबई हा विमानाच्या इकोनॉमी क्लासने करण्यात येईल.
  • किंवा कोलालंपूर ते बाली हा विमानाच्या इकोनॉमी क्लासने करण्यात येईल.
  • बाली ते मुंबई हा प्रवास विमानाच्या इकोनॉमी क्लासने करण्यात येईल.
  • मुंबई ते पुणे हा प्रवास खर्च.
  • हॉटेलचे वास्तव्य हे थ्री स्टार प्रकारचे असेल आणि दोघांमध्ये एक रूम असेल.
  • कार्यक्रम पत्रिकेनुसार जेवणाचा कार्यक्रम असेल.
  • सिंगापूर मधील युनिवर्सल स्टुडीओचा पास समाविष्ट आहे.
  • गार्डन बाय द बे चे तिकीट.
  • सेन्टोसा आयलंड मधील केबल कार, इमेज ऑफ सिंगापूर, मदाम तुसाड, ४ डी मार्वल, अल्टिमेट फिल्म स्टार आणि टाईम्स ऑफ विंग्स चा खर्च समाविष्ट आहे.
  • सिंगापूर आणि मलेशिया विसा खर्च समाविष्ट आहे.
  • जेन्तींग हायलंड मधील केबल कार.

बाली मधील सर्व स्थळ दर्शनाचे तिकीट समाविष्ट आहेत

Exclusions

  • ५% gst
  • काही ठिकाणी वैयक्तिक ठिकाणाचे टॅक्सी खर्च
  • मेट्रो तिकीट
  • प्रवासी विमा समाविष्ट नाही.

Terms and Conditions

 ( टीप – यामध्ये बाली साठी विमान प्रवास जाऊन येवून ५०,००० रुपये आहे यदाकदाचित विमान प्रवास महाग झाला तर एकूण खर्चामध्ये वाढ करण्यात येईल )

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

१,५१,००/- प्रत्येकी ( पुणे ते पुणे )

Tour Dates

 

Payment / Cancelation Information

  1. ऍडव्हान्स बुकिंग साठी २५% रक्कम घेतली जाईल ती रक्कम नॉन रिफंडडेबल असेल.
  2. बाकीची ७५% रक्कम हि प्रवासाची जी तारिख असेल त्या तारखेच्या १५ दिवस आधी घेतली जाईल.
  3. जर तुम्हाला प्रवासाच्या तारखेच्या १५ दिवस आधी बुकिंग रद्द करायचे असेल तर १००% रक्कम आकारली जाईल.