मदुराई, रामेश्वरम आणि कन्याकुमारी सहल

पहिला दिवस

            पुणे रेल्वेस्टेशनवरून मध्य रात्री १ च्या रेल्वेने मदुराईकडे निघणे, संपूर्ण दिवसभर रेल्वे प्रवास.

जेवण = नाही.

दुसरा दिवस

             सकाळी ८.१५ वाजता मदुराई रेल्वेस्टेशनवर उतरून हॉटेलवर फ्रेश होऊन मदुराईमधील मिनाक्षी मातेचे दर्शन करून आपण दुपारनंतर रामेश्वरकडे निघणार आहोत, वाटेत लागणारा पाम्बन ब्रिज पाहून रात्री ८ वाजता रामेश्वर हॉटेलवर पोहोचून जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

तिसरा दिवस

              पहाटे ५ वाजता उठून समुद्र स्नान करून ओल्या अंगानी २१ कुंड ब्राह्मणाच्या मार्फत स्नान करून नाष्टा करून आपण धनुषकोडीकडे जाणार आहोत, धनुषकोडी बीच पाहून आपण संध्याकाळी रामेश्वरमधील हॉटेलमध्ये जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

चौथा दिवस

            सकाळी नाष्टा करून आपण दुपारपर्यंत रामेश्वरमधील धार्मिक स्थळांना भेट देऊन संध्याकाळी कन्याकुमारीकडे निघणार आहोत, रात्री ८ वाजता कन्याकुमारी हॉटेलमध्ये पोहोचून जेवण करून मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

पाचवा दिवस

              सकाळी नाष्टा करून आपण संपूर्ण दिवसभर कन्याकुमारी मधील धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळांना भेट देवून रात्री कन्याकुमारी हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवण = सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण.

सहावा दिवस

             पहाटे ५ वाजता नागरकोइल रेल्वे स्टेशनवरून पुण्याकडे निघणार आहोत. संपूर्ण दिवसभर रेल्वेप्रवास

जेवण = नाही.

सातवा दिवस

            दुपारी ३.२० वाजता पुणे रेल्वेस्टेशनवर उतरणे.

सहल समाप्त

Important information

Inclusions

  • पुणे ते मदुराई हा प्रवास रेल्वेच्या स्लीपर किंवा ३ एसी क्लासने करण्यात येईल.
  • कन्याकुमारी ते पुणे हा प्रवास रेल्वेच्या स्लीपर किंवा ३ एसी क्लासने करण्यात येईल.
  • कार्यक्रम पत्रिकेनुसार जेवणाचे नियोजन असेल.
  • मदुराई ते रामेश्वरम, कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास हा नॉन एसी बसने करण्यात येईल.
  • रामेश्वर आणि कन्याकुमारी मध्ये हॉटेलची व्यवस्था हि उत्तम असेल.

Exclusions

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

 

Tour Dates