दुबई सिटी टूर, बुर्ज खलिफा, डेझर्ट सफारी, शेख जायेद मशीद, मिरॅकल गार्डन ढोव क्रूझ डिनर, ग्लोबल व्हिलेज आणि आबूधाबी

पहिला दिवस

पुणे – मुंबई – दुबई  

             मुंबई विमानतळावर पोहोचून संध्याकाळच्या विमानाने दुबईकडे निघणे, रात्री दुबई मध्ये पोहोचून दुबई हॉटेलमध्ये मुक्काम करणे.

जेवन = नाही.

 

दुसरा दिवस

दुबई सिटी टूर – अटलांटिस पाम – मोनोरेल – दुबई मॉल – बुर्ज खलिफा 

             सकाळी नाष्टा करून आपण दुबई सिटी टूर चा आनंद घेणार आहोत त्यामध्ये आपण दुबई म्युझिअम, बुर्ज अल अरब जगातील सातव्या दर्जाचे हॉटेल समोर फोटो सेशन करणे, जुमेरा मशीद, शेख महम्मद पलेस, गोल्ड मार्केट ला भेट देणे, दुबई अटलांटिस पाममधील मोनोरेल राईड एका बाजूने करणार आहोत, करून आपण बुर्ज खलिफा येथील कारंजे शो चा आनंद घेणार आहोत. बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यावर जाऊन संपूर्ण दुबई दर्शनाचा अविस्मरणीय अनुभव घेणार आहोत, नंतर हॉटेल मध्ये जेवन करून हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

तिसरा दिवस

दुबई – आबुधाबी – फेरारी पार्क फोटो स्टोप – ग्लोबल व्हिलेज – दुबई

             सकाळी नाष्टा करुन आपण आबुधाबी कडे निघणार आहोत दुबई ते आबुधाबी हे अन्तर अंदाजे ११० किमी आहे दोन तासाचा प्रवास करून नंतर आपण दुपारी १२ वा.आबुधाबी येथील शेख जायेद मशिदीला भेट देणार आहोत दुपारचे जेवण करून नंतर आपण अबुधाबी सिटी पाहून फेरारी वर्ल्डला पोहचून संध्याकाळी आबुधाबी मधून निघून पुन्हा दुबईमध्ये येऊन दुपारनंतर आपण दुबई मधील प्रसिद्ध असलेले ग्लोबल व्हिलेज पाहणार आहोत यामध्ये विविध देशांच्या प्रसिद्ध असलेल्या प्रतीकृत्या साकारलेल्या आहेत, अविस्मरणीय अनुभव येतो. साधारण तीन तासांमध्ये आपण ग्लोबल व्हिलेज पाहून रात्रीहॉटेल मध्ये जेवन करून दुबई हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

चौथा  दिवस

मिरॅकल गार्डन – डेझर्ट सफारी  

              सकाळी नाष्टा करून आपण जगप्रसिद्ध असलेले मिरॅकल गार्डन आपण पाहणार आहोत, मिरॅकल गार्डन पाहून दुपारचे जेवण करून दुपारी ३ वा. डेझर्ट कडे निघणे दुबई मधील सर्वात प्रसिद्ध असलेली वाळवंटातील डेझर्ट सफारी, डेझर्ट सफारी करून आपण वाळवंटातील कॅम्प मधील प्रसिद्ध बेली डान्स/तानुरा शो/फायर शो तसेच जेवणाचा आस्वाद घेणार आहोत, संपूर्ण कार्यक्रम संपल्यावर आपण दुबई मधील हॉटेलवर मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

पाचवा दिवस

दुबई फ्रेम  – ढोव क्रूझ

             सकाळी नाष्टा करून आपण दुबईमधील नुकतीच प्रसिद्ध झालेली दुबई फ्रेम पाहणार आहोत. दुपारी जेवण करून शॉपिंग करणार आहोत, रात्री ढोव क्रूझ मधील उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद घेणे तसेच क्रूझ मध्ये बेल्ली डान्स किव्वा तानुरा शो चा आनंद घेवून रात्री आपण दुबई येथे हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत.

जेवन = नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण.

 

सहावा दिवस

शॉपिंग

             सकाळी नाष्टा करून दुपारी जेवण करून नंतर शॉपिंग करून संध्याकाळी विमानतळावर पोहचून रात्रीच्या विमानाने मुंबईकडे निघणे.

जेवन = नाष्टा आणि दुपारचे जेवण.

Important information

Inclusions

 • मुंबई ते दुबई आणि दुबई ते मुंबई हा प्रवास विमानाच्या इकोनॉमी क्लास ने करण्यात येईल.
 • दुबई मधील सर्व साईट सीन एसी बसने करण्यात येईल.
 • हॉटेल मधील शेरिंग हे डबल शेरिंग बेसिस मध्ये राहील.
 • साईट सीन मधील बुर्ज खलिफा मधील १२४ मजल्यावरील जाण्याची आणि येण्याची फी समाविष्ट असेल.
 • मिरॅकल गार्डनची एन्ट्री फी समाविष्ट आहे.
 • तसेच ढो क्रूझ आणि डेझर्ट सफारीची फी समाविष्ट आहे.
 • एका बाजूने दुबई मोनोरेल राईडचे तिकीट समाविष्ट आहे.
 • दुबई फ्रेमचे तिकीट समाविष्ट आहे.
 • सहलीमध्ये जेवण हे दिलेल्या कार्यक्रम पत्रिके नुसार असेल.
 • सहलीमध्ये रोज एक मिनिरल पाण्याची बाटली मिळेल.
 • विसा फी समाविष्ट आहे.
 • हॉटेलमधील टुरिझम दिरहम फी समाविष्ट आहे.
 • काही कारणास्तव कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याचा अधिकार संयोजकांना राहील.

Exclusions

 • पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे प्रवास खर्च समाविष्ट नाही.
 • ५% gst
 • काही ठिकाणी वैयक्तिक ठिकाणाचे टॅक्सी खर्च
 • मेट्रो तिकीट
 • प्रवासी विमा समाविष्ट नाही.

Book a tour

Inclusion

Charges

 Package 1

रु. ७७,२००/-

Tour Dates

20 April 2024